Homeआरोग्यआघाडा वनस्पतींचे आरोग्यासाठी उपयोग

आघाडा वनस्पतींचे आरोग्यासाठी उपयोग

आघाडा ही वनस्पती गणपतीबाप्पाला वाहून त्यांची पूजा केली जाते. तसेच ही वनस्पती मानवी अरोग्यासाठी निरोगी राहण्यासाठी खूप गुणकारी आहे.
१)दोन चमचे आघाड्याचा रस सकाळी उपाशीपोटी पिऊन वरून एक कप कोमट पाणी पिल्याने पोटातील कृमींचा नाश होतो.

२) आघाडा या वनस्पतीच्या पंचांगाचा रस व पंचांगाचा लेप हा विंचू,साप इतर कीटक यांच्या दंशावर खूप गुणकारी आहे.

३) आठ ते दहा आघाड्याची पाने घेऊन स्वच्छ धुवावीत सकाळी उपाशीपोटी चावून खावीत. याने सर्व प्रकारची मुळव्याध नष्ट होतात.

४) आघाडीच्या काडीने दात घासलेने दातांचे विकार निघून जातात व दात मजबूत होतात.

५) आघाड्याच्या मुळीचा किंवा पानाचा दोन थेंब रस काढून डोळ्यांमध्ये टाकल्याने डोळे तेजस्वी होतात डोळ्याचे सर्व विकार निघून जातात.

६) आघाड्याचे पंचांग घेऊन तीन कप पाण्यामध्ये टाकावे एक कप होईपर्यंत उकळून घ्यावे. व एक कप झाल्यावर गाळून घेऊन सकाळी संध्याकाळी जेवण करण्यात एक तास हा काढा प्यावे. यामुळे खोकला कफ दमा अस्तमा धाप लागणे या सर्व समस्या निघून जातात.

७) आघाडीची मुळी थोडीशी गरम करून थोडासा रस काढून दोन थेंब रस कानामध्ये टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात.

८) एक चमचा आघाडीच्या बियांचे चूर्ण एक कप कोमट पाण्यासोबत पिल्याने जास्त भूक लागणे किंवा भस्म्या हा रोग दूर होतो.

९) आघाडीची मुळी चावून खाल्ल्यावर पोट दु:खी वर त्वरित आराम भेटतो.

१०) आघाडीच्या मुळीचा काढा किंवा मुळीचा २०ml रस सकाळी उपाशीपोटी पिल्याने मूत्रविकार च्या समस्या दूर होतात.

११) आघाड्याच्या पानाचा रस महिलांसाठी खूप गुणकारी आहे. आघाडीच्या पानाचा रस पिल्याने रक्तप्रदर ची समस्या त्वरित दूर होतात.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular