७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, पोस्को कायदा
आजरा तालुक्यातील एका मुलीची छेडछाड केल्या प्रकरणी आजऱ्यातील दोन तरुणांना पोलीसांनी अटक केली आहे.७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पोस्कोची कलमे लावण्यात आली आहेत.ताहीर कुदरत माणगांकर (वय २४) व इम्रान मुनाफ जमादार (वय २५,दोघे रा. आजरा) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. ही माहिती गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव नवले यांनी पत्रकारांना दिली.
३ तारखेला एका हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी तालुक्यातील एका मुलीची छेडछाड केली होती.याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीसांनी दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती.यावेळी तीन दिवसांचा आजरा बंद पुकारण्यात आला होता.तीनही दिवस बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.गेले तीन दिवस आजऱ्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
४ तारखेला अज्ञाताविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.दोषांच्या शोधात पोलीसांनी ८ टिम बनवले होते.तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज या टीमने गोळा केली.या दोघांना आज ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती गुन्हा केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करुन अतिरिक्त जिल्हा न्यायालय, गडहिंग्लज यांच्या समोर हजर केले. दोघांना न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नवले, आजऱ्याचे सपोनि सुनिल हारुगडे,सपोनि प्रशांत पाटील (नेसरी), पोलीस कर्मचारी विशाल कांबळे, प्रशांत पाटील यांनी तपास कार्य केले.
शांततेचे आवाहन
आजऱ्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,आक्षेपार्ह कोणतेही कृत्ये करु नये असे आवाहन डॉ.नवले यांनी केले आहे.
- न्यूज सोर्स स्काय इंडिया
मुख्यसंपादक