वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या निट परिक्षेचा निकाल लागला त्यावेळी ती जनावारांचे शेण काढत होती. मोबाईलची रिंग वाजली तीने शेणाचा हात धुतला आणि मोबाईल घेतला .तिला निट परिक्षेत तिला ७२० पैकी ६५२ (९७.७५%) गुण मिळाले होती. निकाल समजताज सारे घर आनंदाने गजबजून गेले. या यशस्वी मुलीचे नाव आहे सिमा सदानंद मांडे रा.कर्पेवाडी (ता.आजरा)
सिमा लहानपणापासून हुशार. चौथी शिष्यवृती परिक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळवला सहावी ते १२ पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय कागल येथे झाले. १० वीला ९६.२०% व १२वीला ९५.४०% मार्क मिळवले.
यापुढे वैद्यकिय शिक्षणाबरोबर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन अधिकारी बनणार असल्याचे तिने सांगीतले
घरची परिस्थीती सर्वसामान्य मात्र गरीबीचा इगो करीत कुणाकडून तीने आर्थीक मदतीची अपेक्षा केली नाही. बुद्धीमतेच्या जोरावर तीने आतापर्यंत वेगवेगळ्या शिष्यवृती मिळवल्या व शिक्षण पुर्ण केले वडीलांची आंबेओहळ प्रकल्पात जमीन गेली. यामुळे दुस-याच्या शेतात जावून घरचे काम करतात.सिमाही भात कापणे जनावाराना चारा आनने, त्यांची देखभाल करण्याचे काम करते.
संदर्भ – सोशल मीडिया
मुख्यसंपादक
[…] आजऱ्याच्या जिद्दी मुलीची कहाणी अमित गुरव […]