चला जाणून घेऊयात आज दिवसभरातल्या बिझनेस News’s
📌 ब्रेकआउट देणाऱ्या बजाज होल्डिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा स्टॉक उच्चांकावर.
• बजाज होल्डिंग्जचा स्टॉक तेजीत आहे आणि सोमवारी त्याने १०% पेक्षा अधिक झेप घेतली.
• कंपनी शेअरने मोठ्या संख्येतील व्यवहारासह त्याच्या किमान स्तरावरील कलरेषेतून ब्रेकआउट दिला.
• या स्टॉकने ६, १५७.२५ रुपयांच्या नव्या सार्वकालिक उच्चांकाचे स्थान पटकावले आहे.
📌 मोठी बातमी; ‘एचडीएफसी’चे दोन्ही शेअर आज प्रचंड वाढले, हे आहे कारण.
• हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे
(एचडीएफसी) एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार आहे.
• एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाला नुकताच मंजुरी दिली.
• आज सोमवारी शेअर बाजारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही शेअरमध्ये मोठी वाढ झाली.
📌 – तेजीच्या शेअर बाजारात या आघाडीच्या दूरसंचार क्षेत्रातील शेअरमध्ये लक्षणीय व्यवहार नोंद.
• भारती एअरटेलचा स्टॉक तेजीत आहे.
• सोमवारच्या सुरुवातीच्या तासाभरातील व्यवहारात तो
जवळपास २% ने वाढला आहे.
• तो काही वेळ स्थिर होता. मात्र काही मिनिटांतच त्याने मूल्यगती घेत वरच्या टप्प्यावर व्यवहार केले.
मुख्यसंपादक