Homeबिझनेसआज दिवसभरातल्या बिझनेस News's | 7 एप्रिल

आज दिवसभरातल्या बिझनेस News’s | 7 एप्रिल

📌 कर्जे महागणार ? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उद्या जाहीर करणार पतधोरण.
रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर स्थिर आहे.
घाऊक बाजारातील महागाईने १३.११ टक्क्यांचा धोकादायक स्तर गाठला आहे.
रिझर्व्ह बँकेचे महागाईचे उद्दिष्ट ४ टक्के इतके आहे.

📌 क्रिप्टो करन्सी झाले स्वस्त; बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख चलनांना नफावसुलीचा फटका.
डिजिटल टोकन्सला आज नफावसुलीचा फटका बसला.
आज गुरुवारी बिटकॉइन, इथेरियम, डोजेकॉइनच्या किंमतीत ४ ते १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
एक बिटकॉइनचा भाव ४३३९७.९६ डॉलर इतका घसरला आहे.

📌 जीएसटी रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईतील एका कंपनीनं ९८ कोटींच्या बोगस पावत्या बनवल्या.
जीएसटी अँटी-इव्हेशन युनिटने बनावट इनपूट टॅक्स क्रेडिड (ITC) रॅकेट उद्ध्वस्त केले.
इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी ९८ कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा वापर.
१४ पेक्षा जास्त अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांनी जारी केलेल्या बोगस पावत्यांवर बनावट ITC दिले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular