( प्रतिनिधी) -: अमेझॉन अँप आणि संकेतस्थळावर मराठी भाषेचा वापर करावा यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. भाषेचा विषय असला कि , प्रत्येक बाबतीत आपल्याला मनसे आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळते. अमेझॉनने न्यायालयात धाव घेत या मुद्द्याला वेगळे वळण दिले ; आणि ठाकरेंना नोटीस आली. अमेझॉन ने मराठीच्या वापरास नकार दिल्याने हा वाद अगदी खळखट्याक पर्यंत पोहचला.
अँमेझॉनची प्रतिस्पर्धी फ्लिपकार्टने मात्र, वेळीच धोका ओळखून आपल्या संकेतस्थळांवर आणि अँपवर मराठीचा वापर करायला सुरवात केली.
अमेझॉनने माघार घेत राज ठाकरेंची माफी मागितली आहे. तसेच अॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिले असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मराठीचे वावडे असणाऱ्यांना हा चांगलाच धडा राज ठाकरेंनी शिकवला आहे असे जनमानसातून भावना व्यक्त होत आहेत.
मुख्यसंपादक