गडहिंग्लज (अमित गुरव ) – सौ. तहूरा सलीम दिडबाग नावाच्या निष्पाप विवाहितेने २५ जानेवारी २०२१ रोजी आजरा येथील सासुरवाडीतील लोकांच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी तहुराने सुसाईड नोट लिहलेले असून त्यात दीर रफिक दिडबाग व आयुब दीडबाग यांनी आपल्यावर अतिप्रसंग करून कुणाला सांगितल्यास मुलासह ठार मारणेची धमकी देली असल्याचे तसेच सासरकडील नणंद व सासूने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे स्पष्टपणे नुमूद केले आहे.
या सुसाईड नोट मधेय सासरकडील एकूण नऊ जणांचे नाव असून फक्त चार जणांची अटक झाली आहे तर उर्वरित पाच आरोपी एक महिना झाला तरी मोकाट फिरत आहेत, न्यायालयाने या आरोपींचा अटकपूर्व जामीनसुधा फेटाळला आहे. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. फक्त शोध चालू आहे अशी उडवाउडवीची उत्तरे देत चालढकल करणे बंद करून सर्व आरोपीना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी तरच तिला न्याय मिळेल. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदकांनी दिला.
निवेदनावर रामगोंडा पाटील, दिलीप माने , नागेश चौगुले, राजेंद्र तारळे , महेश सलवादे , सिद्धार्थ बन्ने , रमजान अत्तार , आशपाक मकानदार , रमजान जमादार यांच्या सह्या असून ते निवेदन पोलीस निरीक्षक गडहिंग्लज यांना देण्यात आले.
मुख्यसंपादक