जगभरात प्रसिद्ध लीग म्हणून इंडियन क्रिकेट लीगची ओळख आहे. क्रिकेटप्रेमी अक्षरशः आयपीएल साठी वेडे होतात.
आज अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ८९ व्या सभेच्या अनुषंगाने एक मोठा निर्णय आयपीएलच्या बाबतीत घेण्यात आला.
आयपीएल मध्ये एकूण १० संघ भिडताना पाहायला मिळणार; पण यासाठी क्रिकेटप्रेमींना २०२२ पर्यंत वाट पाहावी लागेल कारण २०२१ मध्ये हि प्रक्रिया खूप घाईने करावी लागेल .अजून एक वर्षभराने हा बदल पाहायला मिळेल.
संघ वाढले म्हणजे सामन्यांची संख्या वाढणार आहे . नवे दोन संघ कोणते असतील याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही .
अदानी आणि गोएंका ग्रुप संघ खरेदीच्या शर्यतीत आहेत. कानपूर, पुणे आणि लखनौ या संघाची चर्चा असल्याची प्राथमिक माहिती आता मिळत आहे.
मुख्यसंपादक