देवाच्या पाया जरूर पडा व आरक्षणासाठीही जरूर भांडा पण त्यापूर्वी जगातील आर्थिक विषमतेचाही अभ्यास करा व त्यावर विचार करा. दिनांक १०.३.२०२१ च्या लोकसत्तेतील लोकसत्ता विचार या सदराखालील विषमतेचा खेळ सुरूच राहतो हा श्री. चंद्रकांत केळकर यांचा हा अभ्यासपूर्ण लेख त्यासाठी जरूर वाचा. जगातीलच नव्हे तर भारतातील मूठभर श्रीमंतांकडील गडगंज संपत्ती एकीकडे व गरिबीतच कायम खिचपत पडलेला बहुजन समाज एकीकडे, अशी ही आर्थिक विषमता आहे. एकीकडे आर्थिक मक्तेदारी गाजवणारी ही खाजगी भांडवलशाही व दुसरीकडे गरिबीत तडफडणारा समाजवाद व त्यातील शैक्षणिक व शासकीय नोकरीतील आरक्षणाचा वाद यात काही ताळमेळ आहे का याचाही नीट विचार केला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की, मी देवधर्माला, वाजवी भांडवलशाहीला व वाजवी आरक्षणाला विरोध करतोय. प्रश्न हा आहे की, आर्थिक विषमतेवर देवधर्म व आरक्षण हा उतारा आहे काय?
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक