कोल्हापुर- कोरोणा महामारी मूळे देशभरात आणि महाराष्ट्र मध्ये दिनांक २२ मार्च ते ८ जून २०२० देशात संचारबंदी होती. या काळात महावितरण कडून अंदाजे बिले पाठवून तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी बिले पाठवली ; या बिलाच्या आकड्यामुळे गरिबांनाच काय मध्यमवर्गीय लोकांनाही शॉक बसला . आधीच व्यापार उद्योग किंवा काम बंद त्यात ही बिले दुष्काळात तेरावा महिना असा प्रकार झाला होता. त्यावेळी मनसे व इतर पक्षांनी पण तक्रारी केल्या त्यांच्या बैठकी दरम्यान राऊत यांनी आश्वासन दिलं पण सद्या ते फिरवलं . त्यामुळे नागरिक संतापले आहेत.
गेल्या सहा महिन्यात आश्वासन आणि विश्वासघात हा घटनाक्रम लक्षात घेता त्यांनी जनतेची फसवणूक केली. आणि शेवटी राज्यातील वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बिले वसूल करणे ही केवळ शासन व राजकीय फसवणूक आहे तर वीज कंपनीशी संगनमताने जनतेची आर्थिक लूट आहे. त्यांच्या धमक्यांना लोक घाबरत आहेत. त्यांच्यावर मानसिक ताण पडतो आहे त्यामुळे त्यांच्यावर फोजदारी गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज , कागल, चंदगड , आजरा , भुदरगड, राधानगरी च्या कार्यकर्ते नागेश चौगुले , प्रभात साबळे, अविनाश ताशीलदार , प्राजक्ता पाटील, शीतल खनदाळे, विनायक चौगुले, सातगोंडा पाटील, जिया उटी, दीपक लोखंडे , निलेश मांडणीत, सौरभ पाटील , सागर कुंभार , सुनील नाईक , अवधूत मुळे , रोहन निर्मळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष सोबत मनसैनिक रणजित वासनकर , नवनाथ पाटील, रोहित बुरटे, प्रताप उर्फ पिनू पाटील , राज सुभेदार , अनिल निऊनगरे , आनंदा घंटे , प्रकाश कांबळे महंकाळ चौगुले , चंदू सांब्रेकर , इकबाल हिंग्लजकर, विक्रम आर्डी , संदीप शिंदे, चंद्रकांत येसादे, सुभाष रेपे, दयानंद सुतार , काशीनाथ लोहार, राजेंद्र चव्हाण , बाबुराव चव्हाण, प्रवीण वाघरे , दिपक राऊत , राजेश पाटील इ उपस्थित होते.
मुख्यसंपादक