कमळ हे चिखलात उमलते .पण स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यास सक्षम असते. ते आपले राष्ट्रीय फुल आहे. तसेच देवकार्यात देखील या फुलाचा वापर होताना दिसतो. त्याचप्रमाणे ते आरोग्यासाठी ही खूप गुणकारी आहे.
लक्षात ठेवा-:
कमळ बीज पान फूल यांचा वापर करत असताना नेहमी कमळाची फुले पाने मीठ टाकुन गरम करावी त्या पाण्याने दोन-तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावी तयानंतरच त्याचा वापर करावा.
१) कमळ फुलांचा पाकळ्यांची एक चमचा पेस्ट एक चमचा खडीसाखर चूर्ण १ ग्लास पाण्यातून घेतल्यास उष्णता कमी होते.
२) एक चमचा कमळांच्या फुलाच्या पाकळ्यांची पेस्ट एक चमचा खडीसाखर ह्यांचे मिश्रण करून १-२ वेळा खाल्ल्याने लघवीच्या तक्रारी जळजळ होणे , कमी होणे वारंवार थोडी थोडी होणे बंद होते तसेच किडनीचे कार्य सुधारते.
३) कमळ फुलांची पेस्ट करून एक चमचा रस काढावा हा एक चमचा रस यामध्ये एक चमचा मध मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यावे . राहिलेला चोथा याच्या मदतीने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावा . यामुळे चेहऱ्यावरील फोडे पिंपल्स काळे डाग सुरकुत्या निघून जातात चेहरा तेजस्वी बनतो.
४) एक चमचा कमळ फुलांची पेस्ट बनवून घ्यावी एक चमचा खडीसाखर चूर्ण व ग्लास पाणी असा सरबत बनवावा हा सरबत पिल्याने हृदयाची कार्य सुधारते ; अचानक हृदयाची धडधड वाढणे भीती वाटणे बीपी वाढणे रक्त गोठणे या समस्या निघून जातात.
५) कमळ फुलांच्या पाकळ्यांचा एक चमचा रस काढा यामध्ये एक चमचा खडीसाखर मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने रक्ती मूळव्याध किंवा महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान अंगावरून जास्त रक्त जाणे या समस्या त्वरित बंद होतात.
६) अर्धा चमचा कमळ बीज चूर्ण व एक चमचा मध एकत्र करून सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपते वेळेस चाटल्याने मानसिक ताण तणाव निघून जातो झोपा शांत व छान लागते मेंदूचे कार्य सुरळीत चालते.
७) अर्धा चमचा कमळ बी चूर्ण एक काळी मिरी चूर्ण एक चमचा मध हे एकत्र करून दिवसातून दोन-तीन वेळा चाटल्याने कितीही जुना खोकला असेल तरी यावर त्वरित लाभ होतो.
८) एक चमचा कमळ फुलाचे चूर्ण (किंवा कमळ बी चूर्ण) एक चमचा खडीसाखर एक कप देशी गायचे कोमट दुध तिन्ही एकत्र करून सकाळी उपाशी पोटी रात्री झोपते वेळेस नियमित घ्या. गुदभ्रंश योनिभ्रंश अश्या तक्रारी काही महिन्यांमध्येच समूळ नष्ट होतील.
९) एक चमचा कमळ बी चूर्ण पाव चमचा नागरमोथा चूर्ण एक कप गाईचे कोमट दूध आपण घेतल्याने वारंवार होणारा गर्भपात थांबतो व छान गर्भधारणा होते.
१०) कमळ फुलांची पेस्ट बनवून सरबत बनवावा हा सरबत दिवसातून तीन-चार वेळा एक कप प्यावा त्यामुळे वारंवार उलटी जुलाब अति तहान लागणे बंद होते.
- निसर्गोपचार तज्ञ
मुख्यसंपादक