केळफुल जेवढे दिसायला सुंदर असते. तेवढेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
१) केळ फुलांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ए सी व ई असतात.यामुळे मन आणि शरीर नेहमी आनंदी आणि तंदुरुस्त राहते.
२)नियमित केळ फुलाच्या भाजी चे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.व रक्तामध्ये लोहाचे आणी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
३) केळ फुले एक वाटी उकडून घ्यावे यामध्ये चवीसाठी थोडेसे सेंधव मीठ व काळे मिरे चूर्ण टाकून खाल्ल्याने मासिक पाळी मध्ये ओटी पोटी दुखणे अंगावरून ज्यादा रक्ताचा स्राव जाणे. या तक्रारी निघून जातात.
४) बाळंतणीस केळफुलाची भाजी खायला नियमित दिल्याने दूध भरपूर येते.
५) ज्या लोकांना श्वसन विकाराच्या तक्रारी आहेत. अशा लोकांनी आहारात नियमित केळ फुलांच्या भाजीचा समावेश करावा.
६) मधुमेही व कर्करोगी या रुग्णांमध्ये केळफुलाची भाजी ही खूप फायदेशीर ठरते.
७) ज्या महिलांना नेहमी गर्भाशयाच्या तक्रारी असतात. आशा महिलांनी नियमित केळफुलाची भाजी खावी. गर्भाशयाच्या तक्रारी निघून जातात. व गर्भाशय निरोगी राहते.
८) आहारामध्ये ताज्या खेळ फुलांच्या भाजीचा समावेश केल्याने. हृदय मजबूत होते.व उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो.
९) लहान मुलांना केळफुलाची भाजी खायला दिल्याने बल बुद्धीमध्ये छान वाढ होते.
१०) हार्मोन्स नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी केळफुलाची भाजी खूप फायदेशीर ठरते.
केळ फुलाच्या भाजीचा आहारात नियमित वापर करा आपले शरीर निरोगी ठेवता येते.
मुख्यसंपादक