Homeघडामोडीकै.राम सलवादे यांच्या पुण्यतिथि निमित्य औषध फवारणी

कै.राम सलवादे यांच्या पुण्यतिथि निमित्य औषध फवारणी

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) – सामाजिक कार्यकर्ते कै.राम सलवादे यांच्या पुण्यतिथि निमित्य कोविडच्या पार्श्वभूमीवर भीमनगर येथे औषध फवारणी करण्यात आले. संपूर्ण वार्डमध्ये ही फवारणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर लसीकरणाबाबत असलेला खोटा संभ्रम दूर करत जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी व आपल्याला सुरक्षित ठेवावे तसेच गरज भासल्यास आपण मदतीसाठी असल्याचे सांगितले.आणखी कोविडबाबत घ्यावयाची दक्षता सांगून घरी राहण्याचे व शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले.त्याचबरोबर एक नवी कोविड हेल्पलाईन यावेळी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या या काळात कोणत्याही नागरिकाला आरोग्य विषयक इमर्जन्सी गरज भासल्यास त्वरित मदत यावेळी करण्यात येईल असे राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष तथा रुग्णकल्याण समिती सदस्य महेश सलवादे यांनी सांगितले. ज्या कै.राम सलवादे यांनी सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटविला तोच उपक्रम आज यानिमित्ताने करत आहोत आणि हीच खरी श्रद्धांजली त्यांना असेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी संतोष सलवादे ,पवन तरवाळ ,सुशील असोदे ,पृथ्वीराज बारामती ,सागर सलवादे ,किरण म्हेत्री ,अभि असोदे ,बबलू हुले ,रुनी सलवादे,संतोष कांबळे ,चेतन खातेदार ,संदीप सलवादे आदी. उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular