कोल्हापूर – (अमित गुरव ) : रुईकर कॉलनी कोल्हापूर परिसरातील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या अरेराविविरोधात शनिवारी शिक्षक रस्त्यावर उतरले. डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरातील शिक्षकांना संस्थापक जाधव यांच्याकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक ,शिवीगाळ करण्याचा प्रकार होतो त्याचा निषेध सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयावर धडक मारली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनांनी चांगलेच धारेवर धरले. शिक्षकांना वर्गात कोंडून ठेवण्याचा प्रकार निदर्शनास आल्याने हा गोंधळ जवळपास २ तास चालू होता.
एकवटलेल्या सगळ्या संघटना पाहून संस्थेच्या अध्यक्ष जाधव समोरच आले नाहीत. उपाध्यक्ष व माजी मुख्याध्यापिका सुमित्रा जाधव यांनी माध्यमिक शिक्षकांना कोंडले न्हवते ; तर पोलिसांच्या सूचनेनुसार त्यांना आतील आवारातच थांबायला सांगितले होते . शिवाय शिक्षकाकडून झालेले आरोपात काही तथ्य नाही असे सांगितले. पण जयभारत शिक्षण संस्थेच्या श्रीधर सावंत विद्यामंदिर मुख्याध्यापक संजय पाटील यांना या संस्थेच्या अध्यक्ष परशुराम जाधव यांनी काही दिवसांपूर्वी अर्वाच्य भाषेत शिविगाळ व धक्काबुक्की केल्याची माहिती मिळाली.
शिक्षक आमदार जयंत आसगावकार यांनी मध्यस्थी करून शिक्षकांना सोडवले. व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना चुका दुरुस्त करा चुकीचे काम करणार्यांना पाठीशी घालणार नाही असे अंजन घातले.
मुख्यसंपादक