गडहिंग्लज : (प्रतिनिधी ) – “खणगावे आण्णा महिला फौडेशन च्या वतीने आयोजित केलेले विविध उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत. महिलांना त्यांच्या भावविश्वाचे जग मोकळे करण्यासाठी एक अतिशय चांगली संधी या स्पर्धांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.माझे बंधु बसवराज खणगावे यांच्या आग्रही आदेशामुळे मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.महिलांनी आजचा दिवस माझा आहे असे समजून सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.”असे मनोगत नगराध्यक्षा सौ स्वाती कोरी यांनी व्यक्त केले.
खणगावे आण्णा महिला फौडेशन च्या वतीने आयोजित हळदीकुंकु व होममिनीस्टरच्या च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
“कोरोना च्या संकटकाळी बसवराज खणगावे यांनी केलेले मदतकार्य अतुलनीयआहे, या काळातील त्यांचे कार्य पाहून जनतेने त्यांना दातृत्वाची खाणं अशी उपाधी बहाल केली. ” असे या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालन प्रसंगी श्री सुरेश दास यांनी सांगितले.
“आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना महिला आपले स्वत्व विसरतात.अशा महिलांचे सुप्तगुण बाहेर येऊन त्यांचे व्यक्तीमत्व खुलण्यासाठी त्यांना एक हक्काच व्यासपीठ मिळाव म्हणून या फौडेशन ची स्थापना आम्ही केली.त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे” असे कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत बोलताना प्रा लता पालकर यांनी सांगितले.
“2020 हे वर्ष कोरोनावर्ष म्हणून न लक्षात ठेवता कोरोना महायोद्धा बंटीदादा वर्ष असेही गडहिंग्लजकर लक्षात ठेवतिल” असे या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष बंटीदादा कोरी यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना लता पालकर म्हणाल्या.
यावेळी आयोजित खाऊगल्लीत 35 महिलांनी विविध प्रकारचे स्टाॅल लावले होते.
होममिनीस्टर च्या खेळात
सौ. ऐश्वर्या सागर मेतके हिने प्रथम क्रमांक पटकावित पैठणीचा बहुमान मिळविला,द्वितीय क्रमांक पटकावून सोन्याची नथ सौ.मनिषा किरण वाघमोडे यांनी प्राप्त केली.सौ.गीता बंदी यांनी तृतीय क्रमांकासह चांदीची जोडवी मिळविली.
लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांक सविता पोवार, द्वितीय क्रमांक मालु आगलावे,तृतीय क्रमांक सुनंदा बडदारे,चतुर्थ क्रमांक संगिता पाटील व पाचवा क्रमांक कल्पना कदम यांनी मिळविले.
संगीत खुर्चीत प्रथम क्रमांक सारिका पाटील,द्वितीय क्रमांक आशा देवार्डे,तृतीय क्रमांक पुजा नुलकर यांनी प्राप्त केले.
कार्यक्रमासाठी गुरूप्रसाद नुलकर, सुनील कलाल,अमर शेटके,संजय नुलकर,खंडू कांबळे, राघु कलाल,तेजस भानसे,शितल देवार्डे, श्री(shree) शेटके,आशिष शेटके,सिद्धांत उंदरे,प्रतिक कुंदप, ओंकार देसाई , जैयद सय्यद, नंदकुमार मिसाळ,शामराव पवार या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
पद्मा कदम,नीता नुलकर, आशा देवार्डे,सीमा जाधव,सुमन सावंत,पद्मा पाटील,शारदा पालकर,छाया इंगळे,शितल पाटील, सारिका पाटील,सुनंदा बडदारे,अक्षता जाधव,जया शेटके,रूपाली मांडेकर या फौडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी आयोजन व नियोजनात विशेष परिश्रम घेतले.
होममिनीस्टरचे संचलन प्रा लता पालकर यांनी केले तर पंच म्हणून गायत्री नेताजी पालकर, पुजा संजय नुलकर, प्रियांका अशोक कदम, श्रृती रणनवरे,सोनाली कांबळे मयूरी देवार्डे, आशिष शेटके यांनी काम पाहिले.
छायाचित्रे मज्जिद किल्लेदार यांनी घेतली.
KB बिल्डर्स चे मालक श्री विनोद बिलावर व श्री दिग्विजय कदम यांच्या तर्फे या कार्यक्रमातील भाग्यवान विजेत्या 5 महिलांना बक्षीस देण्यात आली.
कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष बंटीदादा कोरी, नगरसेवक बसवराज खणगावे, नगरसेवक नरेंद्र भद्रापुरे,श्री विनोद बिलावर, श्री दिग्विजय कदम,श्री सुरेश दास, सौ.वनिता विनोद बिलावर,श्रेया आजरी,स्वर्णलता गोविलकर इ . मान्यवर उपस्थित होते.
मुख्यसंपादक