HomeUncategorizedगुरू हा गुरुच असतो

गुरू हा गुरुच असतो

सृष्टीवर जे आपल्याला आणतात
ते आपले जन्मदाते असतात
बोट धरून पुढे जाण्यास मदत करतात
आईवडील हे आपले पहिले गुरू असतात.

आयुष्य घडवणारा हा गुरुच असतो
ज्याला खूप मान मिळतो
तो खूप महान असतो
भगवंत हे दुसरे गुरू असतात.

जिथून आपली अ, आ,ई सुरू होते
ती आपली शाळा असते
तिथे आपल्या आयुष्याची कला असते
गुरुवर्य हेच आपले तिसरे गुरू असतात.

जगण्याला जिथून सुरुवात होते
कष्टाची पराकाष्ठा जिथे असते
कळत न कळत खूप धडे मिळतात
तिथे तर असंख्य रुपात गुरू असतात.
           

    रोहित राजाराम काबदुले.
   करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी
   ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.
   मो. नं. ९५९४५३७९८९.

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular