Homeवैशिष्ट्येजळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत !!

जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत !!

त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत…………।धृ।
समाजहित डोळ्यांपुढं होतं
स्वस्वार्थ कुठे दिसले नाहीत
तहानभूकेस दिलात फाटा वाचनाविणा राहिला नाहीत
खाईत लोटलात आपलपणा
सत्यवचनास हटला नाहीत
मग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।1।
योग्य बाजू ताणून धरलात एक समाज धरला नाहीत
स्त्रियां करीता पेटून उठलात
मंत्रिपद धरून बसला नाहीत
घटना निर्मिलीत परिश्रमाने
दिवसरात्र म्हटला नाहीत
मग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।2।
विरोधकांना जागा दावलीत वृत्तीस त्यांच्या धजला नाहीत
सत्याग्रहा आग्रही राहीलात
नेतृत्वा कमी पडला नाहीत
कायद्याचे तुम्ही पंडित होता
दावा कोणता हारला नाहीत
मग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।3।
जगात साऱ्या तज्ञ गणलात
उसंत ज्ञाना घेतली नाहीत
लेखणीने विश्वा सुज्ञ केलात
शंकेला जागा ठेवली नाहीत
तडजोड केलीत प्रसंगी तुम्ही
शहदेण्या कमी पडला नाहीत
मग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।4।
शिक्षणा तुम्हा बाहेर बसवले ज्ञान तृष्णेविना सरला नाहीत
पिण्यापाणी दिले नाही त्यांना
पाण्यात तुम्ही पाहिले नाहीत
बाटलो म्हणणारे महंत तुम्हा
नमल्याविना राहिले नाहीत
मग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।5।
यंत्रणेस तुम्ही धारेवर धरताना
वैचारिक कोण झुंजले नाहीत
भलेभले विरोधक देखील
तुमच्यापुढे टिकले नाहीत
शेवटचा पर्याय तुम्ही होता
साद घालण्या थांबले नाहीत
मग विचार मनी येतो बाबा त्या जळणाऱ्यांना कसे तुम्ही कळला नाहीत………….।6।

   ✍ *कृष्णा शिलवंत* 
         

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular