आज वर्ल्ड टेलिकॉम डे किंवा जागतिक दूरसंचार दिन दरवर्षी १७ मे रोजी मोठया उत्साहात साजरा केला जातो. पूर्वी लोकांना एकमेकांना संपर्क साधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असे. तुम्ही तर हे ही ऐकले असेल की एकादी जवळची व्यक्ती मृत झाली तर ते खूप जास्त कालावधी प्रयत्न नातेवाईकांना ही समजत नव्हते. पण आज आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने कानाकोपऱ्यात घडलेली एकादी घटना काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहचते. या आधुनिक काळात मोबाईल, इंटरनेट या गोष्टी लोकांच्या गरजेच्या बनल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्याशिवाय राहणे शक्य नाही असे कित्येक लोक सांगतील.
याची सुरुवात १७ मे १८६५ पासून सुरू झाली. नोव्हेंबर २००६ मध्ये तुर्की येथील परिषेदेत जागतिक दूरसंचार आणि माहिती आणि सोसायटी हे तिन्ही एकत्रितपणे साजरे करण्यात येणार असे जाहीर करण्यात आले.
१८८० मध्ये ओरिऍंटल टेलिफोन कँपनी लिमिटेड आणि अँग्लो -इंडियन टेलिफोन कंपनी लिमिटेड ने भारतात टेलिफोन एक्स्चेंज ची स्थापन करण्यासाठी भारत सरकारशी संपूर्ण साधला . पण तेव्हा ते सरकारच हे काम करणार त्यामुळे ती परवानगी नाकारली. तत्कालीन गव्हर्नर जनरल मेजर इ बेरिंग यांनी कोलकत्ता एक्सजेज ला सेंटर एक्सजेंज नाव दिले . ज्यात त्यामुळे 93 ग्राहक होते . अश्याच प्रकारे मुंबई मध्ये ही एका टेलिफोन एक्सजेज चे उद्घाटन झाले.
सध्या यात इतकी सुधारणा होत आहे की आपला देश ५G चे स्वप्न पाहत आहे. दूरसंचार मध्ये फक्त बोलणे न होता आता इंटरनेट च्या साह्याने प्रत्यक्ष समोर असल्याप्रमाणे बोलता येत, आपल्याकडील महत्वाची माहिती समोरील व्यक्तीला काही संकेदात सांगता येते.असे बरेच फायदे असले तरी याचा दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्हे तसेच पोर्नव्हिडिओ पाहण्यासाठी ही खूप मोठा वाटा आहे. आपण त्याचा काय व कसा वापर करावा हा ज्याचा त्याने ठरवायचे आहे . कारण याच इंटरनेट मुळे जग इतके जवळ आले की एका क्लिक मध्ये तुम्ही तुम्हाला हवी ती माहिती मिळवून त्यातून आपले ज्ञान वाढवू शकता.
लिंक मराठी च्या संपूर्ण वाचकांना जागतिक दूरसंचार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
संकलन – लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक