असेच काहीतरी लिहण्याची इच्छा होती त्याची सवय कधी झाली हे समजलेच नाही. असेच दिवस जात होते लोकांच्या प्रतिसाद पण उत्तम होता. पण लिहलेले लेखन दीर्घकाळ राहत न्हवते किंवा कॉपी पेस्ट करून त्यांचे श्रेय ही कोणीतरी तिसरेच घेऊन जात. आपण पण लिहत जायचे श्रेयाचा विचार न करता असे कितीजरी म्हटले तरी ती सल कोठेतरी मनात रुतली होती.
अश्यातच काही लोकांनी ब्लॉग तयार करण्याचा सल्ला दिला ज्याच्यामुळे माझे लेखन माझ्याच नावावर राहिले असते आणि कायमस्वरूपी ते अस्तित्वात राहील या विचाराने मी तयार झालो.
पण मला वेबसाईट बनवणे येत न्हवते त्यामुळे माझ्याच मित्राकडे मी हा प्रस्ताव मांडला त्याने अभिनंदन आणि शुभेच्छा देतच माझ्याकडून (लोगो , होस्टिंग , डिझाईन आणि इतर ) कामाचे पाच- पन्नास हजार रुपयांची मागणी केली . ती दिली त्यानंतर त्याला भरघोस प्रतिसाद मिळत गेला.
एके दिवशी त्याच मित्राने माझ्याकडे तुझ्या वेबसाईटवर माझी जाहिरात करण्याचा प्रस्ताव सादर केला. मी म्हटले माझ्या वेबसाईटवर रोज पंधरा ते वीस हजार लोक भेट देतात ; तू मला 1000 रुपये दिलेस तर मला ही थोडी मदत होईल. तर तो म्हणाला तू माझा जवळच मित्र पण तरी ही माझ्याकडून पैसे घेणार ?
मी त्याला स्पष्टपणे म्हणालो तू न्हवते का घेतलंस…?
त्यावर त्याचं मत होते वेबसाईट करणे हा माझा व्यवसाय आहे आणि लेखन करणे तुझा छंद .
आता त्याला कसं सांगू , पुढच्या वर्षी मी पुन्हा त्यांच्याकडे वेबसाईट अपडेट करण्यासाठी , इतर नानाविध कामासाठी जाईन तेव्हा मला फ्री मध्ये करून देशील का ?
मुख्यसंपादक