( प्रतिनिधी )-: ईडी च्या बोलवण्यामुळे संजय राऊत ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन खूप मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यालाच प्रतिसाद म्हणून भाजप नेते अवधूत वाघ यांनी देशभक्तीपर गाण्याचे (नंगा उंचा रहे हमारा ) असे विडंबन ट्विट केले.
राजकीय टीकेसाठी देशभक्तीपर गाण्याचे विडंबन करण्या वरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी मात्र अवधूत वाघ यांच्यावर आग पाखड केली आहे. वाघ यांनी आपली सदविवेक बुद्धी गहान ठेवली की काय ? अश्या विकृत लोकांना पक्षात ठेवतातच कसे ? जणांची नाही पण मनाची तरी लाज बाळगायला हवी होती असे ट्विट करून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. देशासाठी हसत हसत फासावर जाणारे देशभक्त आणि आमचे जवान कुठे आणि असले हे दळभद्री कुठे ? वाघ यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल होणार काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यसंपादक