Homeसंपादकीयनिवडणूकीच्या धामधुमीला कोरोना घाबरतो की काय?

निवडणूकीच्या धामधुमीला कोरोना घाबरतो की काय?

कोल्हापूर – स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे पोट कष्टाने भरण्यासाठी निघालेल्या लोकांना कोरोनाच्या पाश्वभूमी वर निर्बंध .पण निवडणूक मध्ये निघालेल्या झुंडीवर साधा आक्षेप ही नाही असा भेदभाव का ? असा रोष जनतेच्या मनात खदखदू लागला आहे. आणि तो व्यक्त करण्यासाठी लोक सोशल मिडिया चा पुरेपूर वापर करत आहेत.
तुम्हाला आम्हीच दिसतो का त्यांनी पण सभा , प्रचार , शक्तिप्रदर्शन केलेच की त्यांना तुम्ही बोलत नाही असा प्रतिप्रश्न नेत्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते करताना दिसत आहेत. पण त्यांना कोण समजवणार की ‘पालक’ च दारू पित असेल तर पोराला दारू वाईट ती पिऊ नये असे कोणत्या तोंडाने सांगणार . आज तुम्ही जबाबदार मंत्री आहात तर कोणी त्या त्या पक्षाचा मोठया प्रतिष्ठेच्या पदावर कार्यरत आहे , तुम्हीच असा स्वतःच्या पोरांच्या किंवा पुतण्याच्या मानसन्मान वाढवण्यासाठी कार्यक्रम करत बसला तर तुम्हाला मानणाऱ्या जनतेने काय संदेश घ्यायचा.
या निवडणुकीत प्रचारात व्यस्त राहण्यापेक्षा जर तुम्ही लोकांना ऑक्सिजन सिलेंडर आणि बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असते तर बूथ वर जाऊन नमस्कार किंवा नावाचा चमत्कार करण्याची वेळच आली नसती.
उद्या जर या निवडणुकीतील एकदा कार्यकर्ता किंवा त्याच्यामुळे गावातील लोक पॉझिटिव्ह झाले तर त्याची तुम्ही मोठे- मोठे नेतेमंडळी नैतिक जबाबदारी स्वीकारणार का ? की पुन्हा हा जनतेचीच चूक समजून पुन्हा मायबाप जनतेलाच वेठीस धरले जाईल. असे नानाविध प्रश्न नागरिकांच्या मनात धगधगु लागलेत.

  • लिंक मराठी टीम

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular