काही गोष्टी या अनमोल असतात हेच खरे . आणि त्यामुळेच आपल्या देशात अश्या अनेक नानाविध गोष्टी आहेत ज्या जपून ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील कित्येक नावे कदाचित तुमच्या परिचयाची असतील तर खाली नक्की कॉमेंट करू शकता…
ऐतिहासिक श्रणाना कारणीभूत ठरणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी या जपून ठेवल्या जातात आणि कालांतराने त्याचा लिलाव होतो व त्याला मागणी जास्त प्रमाणात असल्याने त्यासाठी मोठी किंमत ही चुकवावी लागते .
http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/
सध्याच भारताला ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा खेळाडू भारतभर चर्चित असतो ; आता तर त्यांनी वापरलेला भाला ही चर्चेचा विषय होत आहे . कारण काही दिवसापूर्वीच पंतप्रधानाना मिळालेल्या खास भेटवस्तूचा इ- लिलाव झाला . या लिलावात नीरज चोप्रा च्या भाल्याची ही गणना होती या भाल्याला दिड कोटी रुपयांची अखेरची बोली लागून विकत घेतला आहे. भवानीदेवी या खेळाडूची सही असलेली तरवार १.२५ कोटी , तर सुमित अंतील या भालाफेक खेळाडूचा भाला १.२ कोटी मध्ये लिलावात गेला. टोकियो मध्ये कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लोवलीना बोर्गेहीन हिचे बॉक्सिंग ग्लोव्हज ९१ लाख रुपये देऊन विकत घेतले आहे. अश्या प्रकारे १३४८ वस्तूचा लिलाव करण्यात आला. यासाठी एकूण ८६०० बोली आल्या होत्या.
http://linkmarathi.com/abacus-म्हणजे-काय-सर्व-माहिती-ए/
सरदार पटेल यांच्या प्रतिकृतीला सर्वाधिक १४० बोली लागल्या तर लाडकी गणेशासाठी १४७ ; पुणे मेट्रो लाईन १०४ आणि विजयी मशाल ९८ बोली लागल्या. यातून मिळालेली रक्कम नमामी गंगे मोहिमेसाठी खर्च होणार आहे.
संकलन – टीम लिंक मराठी
मुख्यसंपादक