(आजरा ) -: लॉक डाऊन मध्ये घरी असलेल्या प्रणालीच्या मनात चिवचिवाट चालू होता ; की बाहेर तर कोणीच नाही मग ह्या चिमण्या किंवा मुक्त पक्षी आपला उदरनिर्वाह कसा करत असतील ? काय खात असतील ? आपल्या पिल्लाचा सांभाळ करताना त्यांची किती दमछाक होत असेल ?
त्यांच्या प्रश्नाला फक्त वाचा न फोडता कृतीतून असे काही केले की सर्वस्तरातून तिचे कौतुक होत होते. आपल्या बाल्कनी मध्ये तीने पक्षासाठी ध्यान्य ठेऊन तिच्या घरी येण्याचे आमंत्रण तर दिलेच पण त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत आपली माणुसकी दाखवली. तिचे ही बाब लक्षात घेऊन गुरव अकॅडमी चे अध्यक्ष अमित गुरव यांनी प्रोत्साहन देण्यासाठी तिचा व्हिडीओ लोकांपर्यंत पोहचवला.
माझ्या वडिलांकडून मला पक्षीप्रेमाची प्रेरणा मिळाली असून मी सकाळ – संध्याकाळ चिमण्यांना खाऊ घालते , शक्य असल्यास तुम्हीही हे काम करून त्यांना जगण्यासाठी साथ द्या असे आवाहन प्रणाली विकास फरणेकर करते. तिच्या कार्यासाठी लिंक मराठी कडून शुभेच्छा.
अश्याच प्रेरणादायी बाबी लिंक मराठी मार्फत लोकांच्या प्रयन्त पोहचवण्यासाठी आम्हाला साथ द्या.
मुख्यसंपादक