आजरा – (अमित गुरव ) -: पत्रकार संभाजी जाधव यांच्या बद्दल खूप एकूण होतो मोठ्या पत्रकारांशी काय व कसे बोलायचे हे समजत न्हवते त्यामुळे तसा मी सर्वांपासून थोडा अंतर ठेवूनच होतो. पण त्याच्याशी माझा व्ययक्तिक संपर्क साधारण २ वर्षांपूर्वी आला. आणि त्या ओळखीची रूपांतर एका मैत्रीच्या नात्यामध्ये कधी झाले कळलेच नाही.
पुस्तक वाचनाचा वेड हे सर्वश्रुत आहे , जनसंपर्क वाढवण्याचा आणि परखड बातमी लेखनाचा आनंद तालुक्यातीलंच नाही तर राज्यातील वाचनप्रेमी नी आजवर घेत आहेत. कित्येक लोक पुस्तक वाचत नाहीत पण त्यांच्याजवळ ठराविक वेळ घालवतात कारण त्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाचा साराँश काही कालावधीत समजावा हा गुप्त उद्देश .(या उद्देशामध्ये मी सर्वप्रथम )
जाधव यांच्या जवळ लोकसंपर्क तर खूप आहे पण त्यांना तोंडावर सत्य बोलण्याची सवय असल्याने जास्ती कोणी नादाला लागत नाही. समोरची व्यक्ती कोण ती किती मोठी की छोटी यापेक्षा योग्य मार्गदर्शन करणे हे त्यांच्या रक्तात भिनले आहे.
बातमी ही माझी ओळख आहे . त्यात कोणीही ढवळाढवळ करायची नाही असा त्यांचा विचार संपादकांना किंवा प्रतिष्ठित नेत्यांना ही रोखठोक पणे सांगणे त्यांच्यासाठी अवघड नाही.
अश्या पत्रकार ते संपादक असा प्रवास करणाऱ्या आणि शिवप्रेमी संभाजी जाधव यांना लिंक मराठी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मुख्यसंपादक