कोरणाच्या कालखंड मध्ये मनोरंजन विश्वात देखील दुःखद बातम्यांचा सपाटाच लागला असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक कलाकार पडद्याआड गेले. सर्वाधिक लोकप्रिय द. भारतीय अभिनेता पुनीथ राजकुमार यांचे निधन झाले . त्यांच्या अवघ्या ४६ वर्षात प्राणज्योत मावळली .
माहितीनुसार त्यांना सकाळी 11:30 च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते , ही बातमी समजताच चाहत्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली . त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने मृत्यू ला दुजोरा दिला नाही पण काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
त्यांना फिटनेस फ्रिक आणि युवारत्न असेही संभोधले जात असे. त्यांचा जन्म १७ मार्च १९७५ रोजी झाला होता. त्यांनी २९ चित्रपटात काम केले . लहानपणी ते अनेक चित्रपटात दिसले. कन्नड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रसिद्ध आणि जास्त मानधन घेणारे कलाकार म्हणून ओळख निर्माण होत होती.
मुख्यसंपादक