Homeमुक्त- व्यासपीठप्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

विर हुतात्म्यांच्या रक्ताचे
जेव्हा या‌ मातीत पाट वाहिले…

तेव्हा हे सुंदर स्वातंत्र्य आम्ही पाहीले….

घुमत होता नारा फिरंग्यांचा
हुकूम चालत होता त्यांच्या
इथे जुलमी राजवटीचा….

स्वत:च्या मालावर नव्हता
इथे स्वत:चा अधिकार….
पोरा बाळांचे‌ करत होते नुसते हाल
होते फिरंगी मोठे जहाल…

आया बहिणींची त्यांना कदर नव्हती
भर दिवसा डोळ्यांदेखत
अब्रूची लक्तरे तोडत होती…

त्यांचा अन्याय सहन झाला नाही काही या भारत मातेच्या वाघांना
पळवून लावण्याचं ठरवलं फिरंग्यांना….

एका सोबत दुसरा दुसऱ्या सोबत तिसरा झाली मोठी वीरांची श्रृंखला
या मातिचे वाघ अन्यायाविरुद्ध गरजले,पाहून वाघांना फिरंगी थरकापला….

आवळल्या मुसक्या अन्यायाच्या
फिरंग्याला मातीत लोळवला…
मायभूमी रक्षीली फिरंगी पळवून लावला…

कित्येक विरांनी आपला लहू अर्पीला
तेव्हा तर आज हा स्वातंत्र्याचा सुवर्णदिन उगवला….

म्हणून तर हा सुंदर तिरंगा अभिमानानं फडकतो आहे….
रंग केशरी त्या वीरांच्या बलीदानाचं
गीत गात आहे….

रंग पांढरा त्या विरांचा त्याग दर्शवीत आहे…

त्यातील अशोकचक्र देत
आहे संदेश गतीचा …
रंग हिरवा समृद्धीचा,भरभराटीचा…

http://linkmarathi.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%95-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5/
- सौ.भाग्यश्री आपेगांवकर 
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular