पुणे- (प्रतिनिधी) -: कोरोना काळात पुणे शहरातील खासगी शाळेकडून मनमानी कारभार करत अकारण फी वाढवली गेली. त्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यासाठी पालक संघटना गेल्या. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालकानी आक्रमक पवित्रा घेतला आणि गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अचानक आक्रमक पवित्रा घेतलेल्या पालकांचा रोष पाहून त्यांनी तात्काळ मागच्या दाराने जाण उचित ठरेल म्हणून निघून गेल्या.
बालभारती च्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्या पुण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने अधिसूचना काढली मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले त्यामुळे हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे गायकवाड म्हणाल्या. त्यामुळेच पालकांनी घोषणा बाजी केली.

मुख्यसंपादक