कवी कुसुमाग्रज यांची माफी मागून….
मूळरचना:- ओळखलंत का सर मला(कणां)
ओळखलं का भाऊ मला,बरळंत आला कोणी?
कपडे होते मळकटलेले, डोळ्यामधे पाणी..!
हळूच बोलला नंतर रडला तेंव्हा नरडं ताणून
पोरांची त्या टोळी आली, गेली दांड्याने हाणून
चार कार्टी डुकरासारखी घरात माझ्या घुसली
मोक्कार हाणला मला, काँटर खिशात फुटली
बंडी फाटली, नाडी तुटली, हाल नको ते केले
पुरावा द्यावा म्हणून अजून शर्ट नाही शिवले
कोणी नव्हतं संगती भाऊ, खरंच मी सांगतो आहे
आठवता रडतो आहे, आसवे माझी ढाळतो आहे
पाकीटात हात जाताच, कण्हत कुंथत उठला
अजून थोडे भाऊ, म्हणून गोंधळ घातला
मोडून गेला कणा तरी सोडणार नाही बाणा
खोलीत घेऊन चार हाणा पण कार्यकर्ता म्हणा
✍️ श्री.विजय शिंदे….
३२शिराळा,सांगली.
मुख्यसंपादक