भाग ३२
निधीसंकलनाला सुरुवात करताना
संस्थेच्या उपक्रमाचे स्वरूप लक्षात घेता कोणाकडे कशासाठी मदतीचा हात मागायचा ह्यांचा धोरणात्मक निर्णय सर्वस्वी विश्वस्तांनी घ्यायचा असतो.
उदा. १. आरोग्य व व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व गुटखा, तंबाखू, सिगारेट उत्पादन करणारे दाते,
२. स्वदेशी चळवळीवर काम करणारी संस्था व किंवा तत्सम संस्थेची मदत वगैरे !
नियोजनाच्या प्रक्रियेतील टप्पे :
▶️ आता आपण कुठे आहोत?
▶️ कुठे पोहचायचे आहे?
▶️ कसे जाणार आहोत?
▶️ तिथंपर्यंत पोचण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
▶️ आपण यशस्वी झालो हे कसे समजणार?
निधी संकलनासाठीचे साधारण ३-५ वर्षासाठीचे नियोजन
🔹व्हिजन : आपणास निधीची गरज का लागते?
🔹भागधारक : आपण ज्यांच्यापर्यंत सुविधा पोहचवितो त्यांना धरून.
🔹मिशन : आपण प्रत्यक्ष जे काम करतो ते
🔹 रणनीती : नव्याने येणाऱ्या संधींचा सुयोग्य वापर
🔹 मूल्य आणि संस्कृती : संस्कार आणि नितीमुल्ये
🔹 परिस्थितीचे विश्लेषण : सखोल अभ्यास
🔹 कळीचे मुद्दे : ह्यांवर प्रथम भर दिला पाहिजे,
🔹 मुख्य हेतू : आपल्याला कोठे पोहचायचे आहे.
🔹 देणाऱ्यास मिळणारा फायदा : हीच त्यांच्या देणगीमार्फत योजना
निधी संकलनासाठी विशिष्ट रणनीती आणि नियोजन ह्यांची गरज काय?
▶️ संस्थेच्या कोणत्याही उपक्रमाचे/प्रकल्पाचे सादरीकरण उत्तम प्रतीचे व्हावे ह्यासाठी
▶️ उपलब्ध संसाधनाचा सुनियोजित वापर करता यावा ह्यासाठी
▶️ प्राधान्य क्रम असलेल्या उपक्रमावर/ प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करता याव यासाठी
▶️ भविष्यातील दिशा स्पष्ट होण्यासाठी
▶️ आपल्या गरजेनुसार काय प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक हि रणनीती ठरविता येते.
▶️ प्रशिक्षणाबरोबरच स्वानुभवातून हि अधिक चांगलं शिकायला मिळेल.
▶️ आपल्या संस्थेच्या संदर्भात प्रभावी ठरणारी तंत्र आणि पद्धतीच केवळ निवडा.
▶️ निधी स्त्रोताच्या वेगवेगळ्या मार्गाचा अभ्यास व योग्य समित्यांची निवड करा.
▶️ प्रकल्प दात्यांशी वैयक्तिक संपर्क आणि प्रत्येक दात्यांच्या देण्याच्या क्षमतेच्या, पार्श्वभूमीचा अभ्यास
▶️ धोके काय असू शकतील हे वारंवार तपासून पहा आणि ते कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील रहा.
▶️ Slack Season माहिती करून घ्या.
▶️ आलेल्या अनुभवाचे दैनंदिनीच्या माध्यमातून संकलन करा.
▶️ झालेल्या प्रयत्नाचा आढावा व पुढील कालावधीचे नियोजन करा.
या कामासाठी सुरुवातीला होणारा खर्च:
▶️ देणगीदारांचा शोध माहिती संकलन
▶️ संस्थेची लिखित/ मुद्रित साधन साहित्य माहिती प्राप्ती
▶️ निधीसंकलनासाठी जर काही उपक्रम किंवा मोठा कार्यक्रम करायचा असल्यास त्याची तयारी, नियोजन
▶️ प्रतिसाद न देणाऱ्या देणगीदारांसाठी खर्च झालेला वेळ
▶️ या कामातून कधी-कधी आर्थिक तोटा देखील होऊ शकतो. त्याचीही मानसिक तयारी ठेवायला हवी.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक