भाग ३५
स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे
निधीसंकलानासाठी आपले सादरीकरण कसे असावे?
भविष्यातील देणगीदारांबरोबर प्रत्यक्ष भेटून चर्चा करताना आपल्याकडे कल्पकता, ज्ञान, योग्य अशी प्रगल्भता, उत्तम संवादकौशल्य, समयसूचक, हजर जबाबीपणा आणि जोडीला प्रभावी अशी देहबोली असण आवश्यक असत.
आपल्या व्यक्तिमत्वाचा, देहबोलीचा समोरच्यावर पडलेला प्रभावच प्रत्यक्ष देण्याच्या क्रियेत कारणीभूत ठरतो. आणि हि कौशल्य सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि कामाशी आपली असलेली बांधिलकी यातून आत्मसात करण शैय आहे. अशा प्रकारे आपल्या संस्थेच्या विविध उपक्रमाची मांडणी करताना हे ध्यानात ठेवा.
भेटीपूर्वी :
▶️ वेळेपूर्वी बैठकीत/ चर्चेस उपस्थित राहणे.
▶️ वेळेत जाणे / भेटीची वेळ पाळणे
▶️ भेटीची वेळ व संधी दिल्याबद्दल आभार मानावयास विसरू नका.
▶️ आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम आधी ठरवा. २/३ प्राधान्यक्रमाने गरजा व संबंधीत विनंती ह्यांची यादी तयार ठेवा.
▶️ देणगीदारांबाबतची माहिती आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ.
▶️ निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्या सामाजिक प्रश्नाबाबत आस्था वाटते?
▶️ यापूर्वीच्या देणगीबाबत माहिती- कोणत्या कामासाठी, कधी, त्यांचे ऑडीट कसे केले जाते इत्यादी.
▶️ देणगीदाराबाबतची नुसतीच घडलेली चांगली घटना, पुरस्कार इ. बाबत माहिती गोळा करणे.
▶️ आपल्या संस्थेच्या कार्याशी संदर्भ व थेट संबंध असणारी देणगीदारांची एखादी गरज किंवा त्यांना त्यात असलेली रुची ह्याची आधी माहिती काढून ठेवणे.
▶️ सर्वात महत्वाचे-निर्णय प्रक्रियेत कोण सहभागी आहेत हे शैय झाल्यास जाणून घ्या व त्यांची पूर्ण माहिती काढून ठेवा.
भेटीदरम्यान :
▶️ उपस्थित सर्व लोकांना स्वतःची व तुमच्या बरोबर कोणी असेल तर त्यांची थोडे यात ओळख करून द्या, तुमचे Business Card ( visiting Card) द्या.
▶️ आपल्या संस्थेची माहिती देणारे माहिती पत्रक ब्रोशर, वार्षिक अहवालाची जरूर एक प्रत सोबत ठेवा आणि वाटल्यास एक प्रत देऊनच या.
▶️ जिथे-जिथे आवश्यक तिथे नियम/Protocol पाळण चांगले, त्यानंतर, उपस्थितांची परवानगी घेऊन सादरीकरणाला सुरुवात करावी.
▶️ संस्थेच्या सर्व उपक्रमाची माहिती देणारे आणि २० मिनिटांपेक्षा जास्त नसणारे. सुटसुटीत सादरीकरण करावे.
▶️ संस्थेचे उपक्रम मांडणारा Video (कालावधी- १० मिनिटे) उपलब्ध असेल तर देणगीदारांन पूर्व परवानगीने जरूर दाखवा/जरूर द्या.
▶️ शक्यतोवर प्रस्ताव तयार ठेवा (संसाधनांची आवश्यकता, वेळेचे नियोजन आणि लाभार्थीची संख्या, स्वरूप स्पष्ट करायला हवे)
▶️ तुमच्या संस्थेच्या कामाचा इतिहास, बदल घडवल्याची उदाहरण, त्या प्रश्नावर काम करण्यातला तुमचा अनुभव आणि हातखंडा अधोरेखित करा.
▶️ आपली तातडीची व निकडीची गरज अधोरेखित करा. प्राधान्यक्रमानुसार मदतीची विनंती करा. (निधी एखादा समाज उपयोगी कामासाठी लागतो. संस्था हे माध्यम असते. यामध्ये योग्य प्रकारे भावनांना हात घालायला हवा. तसच कामाची बांधिलकी असायला हवी.
▶️ एकाच उपक्रमास एकापेक्षा जास्त व्यक्ती/संस्थेच्या सहभाग असल्यास तसे स्पष्टपणे नमूद करा.
▶️ अवास्तव बोलणे टाळा थापा मारणे केव्हाही धोक्याचे
▶️ विचारलं नाही तर मिळणार नाही. तुमची आर्थिक गरज स्पष्ट करा.
▶️ देणगीदाराच्या वैयक्तिक तत्वांचा आदर करा.
▶️ आपल्या संस्थेस भेटीचे निमंत्रण द्या.
▶️ शेवटी उपस्थितांचे आभार मानायला विसरू नका. पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तारीख, वेळ, ठिकाण, हेतू आणि संबंधित व्यक्ती हे ठरवून द्या. कारण या गोष्टी ठरवण्यासाठी पुन्हा संधी मिळणार नाही.
▶️ देणगीचा फाॅॅर्म व्यवस्थित भरून घेणे.
▶️ देणगीचा चेक बँकेत जमा करणे.
▶️ चर्चेत ठरवल्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणे.
▶️ देणगीदारांकडून त्यांच्या ओळखीच्या लोकांची माहिती घेणे.
भेटीनंतर
▶️ भेटीनंतर आभार मानावयास विसरू नका.
▶️ पाठपुरावा चालू ठेवा.
▶️ भेटीदरम्यान ठरलेल्या गोष्टीची पूर्तता करण्यास विसरू नका.
▶️ देणगीदारांचे इतर माहितीचे तपशील ध्यानांत ठेवणे उदा. वाढदिवस, वर्धापनदिन, नवीन दुकानाचे, कंपनीचे, कार्यालयाचे भूमिपूजन, उद्घाटन इत्यादी.
▶️ आभारचे पत्र व पावती वेळेत पाठवणे.
▶️ देणगीची रक्कम मोठी असल्यास पावती व आभाराचे पत्र स्वतः नेऊन देणे.
▶️ शुभेच्या/ भेट कार्ड पाठवणे.
▶️ उत्तरदायित्व पारदर्शकता चांगल्या प्रकारे राखता यायला हवी.
अनुभव आणि अभ्यासानंतर योग्य वाटणारी रूपरेषा वर नमूद केलीये परंतु, सादरीकरणासाठी तीच पाळावी असा आग्रह नाही. तुमचा अभ्यास होण म्हणजेच देणगीदारासंबंधी माहिती मिळवण आणि सादरीकरणाची संपूर्ण तयारी करण हे अतिशय महत्त्वाचे, आणि हे हि लक्षात असू द्या कि आपला प्रभाव इतकी हि जास्त होता कामा नये को जेणे करून देणगीदारांमध्ये न्यूनगंडाची अथवा “ नकारत्मक भावना” अशी होईल.
हे ध्यानात ठेऊया….
▶️ नकार पचवण्याची क्षमता
▶️ सुरुवातीला जरी यश मिळालं नाही तरी आपला उत्साह, उर्जा कायम राहायला हवी.
सुरुवातीला छोट्या छोट्या अनुभवातून भविष्याचा विचार करून काही पावलं उचलून थोडे यश संपादन करायला प्रयत्न करू म्हणजे आपला आत्मविश्वास वाढेल.
▶️ “विचारल्याशिवाय कळणार नाही आणि मागितल्याशिवाय मिळणार नाही” त्यामुळे अपयश मिळालं तरी थांबून चालणार नाही.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक