Homeवैशिष्ट्येमहात्मा जोतिबा फुले - टाळता न येणारा द्रष्टा युगपुरुष.

महात्मा जोतिबा फुले – टाळता न येणारा द्रष्टा युगपुरुष.

  पेशवाई राजकीय दृष्ट्या १८१८ ला जरी संपली असली तरीही उच्चवर्णियांच्या मानसिकतेत पेशवाईच्या अस्ताचे दुख बोचत होते.त्याचे पडसाद प्रतापसिंह छत्रपतींची घालमेल ब्राह्मणांनी कशी केली? ह्या अखंड प्रकरणात सहज लक्षात येतात.इतिहास लिहावा आम्ही..!!सांगावा ही आम्ही..!!आणि अर्थ लावावा ही आम्ही...!! समाजसुधारणा करायची झाल्यावर त्याला आमचाच होकार हवा हि मानसिकता धर्ममार्तंडांची प्रबळ होती.
    ह्या परिस्थितीत जातिभेदाचे खंडन महात्मा फुलेंनी आक्रमकपणे केले.म्हणून म फुलेंवर धर्मप्रेमींचा राग असावा पण हे करणारे फुले कशाच्या आधारावर करत ?हा प्रश्न उरतो.फुलेंना पाण्यात पाहणारे ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या ब्रिटिश प्रेमात शोधतात...सिद्धाचार्य अश्वघोष हृया लेखकाने रचलेल्या "वज्रसूची" या ग्रंथाच्या संस्कृत बृहत्पाठाचा भावानुवाद संत तुकोबारायांच्या शिष्या बहिणाबाई ,छ शाहूकालीन कवी श्यामराज व नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनी केला .(संदर्भ-रा चिं ढेरे- संतसाहित्य आणि लोकसाहित्य)ह्या वज्रसूची ग्रंथाचा प्रभाव महात्मा जोतीराव फुलेंवर जबरदस्त होता.ह्या ग्रंथाच्या आधारे तात्या पडवळ ह्यांनी" एक हिंदू" ह्या टोपण नावाने 'जातिभेदविवेकसार' ग्रंथ लिहिला तो १८६५ साली जोतिरावांनी प्रकाशित केला.कबीराची विचारधारा हि म फुलेंनी कबिरपंथियांकडून समजून घेतली.
     ऊठसुठ म फुलेंच्या चळवळीला ख्रिस्तींचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केलेल्या तथाकथित धर्मप्रेमींना हि चपराक आहे.फुलेंच्या विद्रोहाची बीजे परकीय विचारसरणीत नव्हती ती इथल्याच मातीत होती.म फुलेंना ख्रिस्तसेवक म्हणलेल्या त्यांच्या नतद्रष्ट पुतण्याच्या वारसांना मोहन भागवत वंशज म्हणून संघाच्या व्यासपीठावर बसवतात.
     महात्मा फुलेंची चळवळ ही भिक्षुकशाहीच्या पोटावर लाथ मारणारी चळवळ ठरली .भिक्षुकशाही इतकी धर्ममार्तंडांच्या रक्तात भिनली होती की पेशवाईत असलेला श्रावणी देकार हा इंग्रजांनी चालु ठेवावा म्हणून आमच्या धर्मभास्कर तेजोनिधींनी इंग्रज अधिकारी वर्गाचे उंबरे झिजवले होते.एका ख्रिस्ती सत्तेकडून श्रावणी दक्षिणा स्विकारताना आमच्या विद्यावाचस्पतींना लाजा वाटत नव्हत्या .धर्माजी डुंबरे ह्या फुलेंच्या अनुयायांनु पुरोहितांच्या शिवाय लग्न लावायची चळवळ चालू केली.तेव्हा ह्याच धर्ममार्तंडांनी आमच्या पोटावर लाथ मारली म्हणून कोर्टात दावा दाखल केला. मारवडी आणि कुलकर्णी ह्यांच्या हडेलहप्पी आणि शेतकर्यांना नागवण्याच्या धोरणावर फुलेंनी प्रहार केले.
     सामाजिक चळवळीच्या प्रत्येक अंगाला आपला परिसस्पर्श केलेल्या म फुलेंच्या मृत्युनंतर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांनी ब्राह्मण विधवेच्या दत्तक घेतलेल्या यशवंत नावाच्या मुलाने केले.पुढे प्लेग च्या साथीत लोकांवर उपचार करता करता सावित्रीबाई फुले आणि यशवंतराव हि मृत पावले महात्मा फुलेंचा रक्ताचा वारसा संपला...!! पण ह्या म फुलेंनी लावलेल्या सामाजिक चळवळीचा वृक्ष पुढे फोफावला ..!! महाराष्ट्राची वैचारिक आणि सामाजिक सुधारणांची चळवळ समृद्ध केली..!!
    राजसत्ता येतात जातात..!!धर्माचे संदर्भ बदलतात ...!!पण महापुरुषांची अधिष्ठाने चिरंजीव राहतात.!!
 विनम्र अभिवादन.

-सचिन शिवाजीराव खोपडे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular