1540 साली महाराणा उदयसिंह व महाराणी जयवंताबाई यांच्या पोटी प्रतापसिंह यांचा जन्म झाला. मनुष्याकडे जर आत्मबल असेल तर कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे महाराणा प्रताप होय ! प्रतापसिंह जेव्हा सिहासनवर आले तेव्हा मोगलांचे संकट मोठे होते , राज्याची घडी नीट न्हवती , मेवाड चा मानबिंदू चित्तोडगड मोगलांकडे गेले होते . प्रतापसिह यांनी राज्याची घडी बसवली, काही ठिकाणची बंड मोडून काढली , शेजारी व इतर काही राज्यासोबत मैत्री संबंध प्रस्थापित केले .या सर्वानंतर मोगलांचे आक्रमण पुन्हा आले व हळदी घाटीचे ऐतिहासिक युद्ध झाले . याच युद्धात पूर्वार्धात राजपुतांनी मोगलांना झोडपले होते , उत्तरार्धात प्रतापसिह यांच्या हातून मोगल सेनापती मानसिंह थोडक्यात बचावला.मोगल संख्येने प्रचंड होते व त्यांनी प्रतापसिंहना लक्ष करायला सुरुवात केली, त्यांच्यावर हल्ल्याचा जोर वाढला ,परिस्थिती पाहून राजपूत सैन्यातील झाला मानसिंग नावाचा सरदार पूढे आला आणी त्याने महाराणा प्रताप याना युद्धातून निघून जाण्याची विनंती केली , महाराणा प्रताप यांचे राजछत्र( बहुदा डोक्यावरील कवच ) मानसिंग ने स्वतःकडे घेतले त्यामुळे मोगल झाला मानसिंग लाच महाराणा प्रताप समजून त्याला लक्ष करू लागले ,शेवटी झाला मानसिंग ने शौर्याची परिसीमा करून आपले बलिदान दिले.या युद्धात मोगलांचे खूप नुकसान झाले . याच युद्धानंतर मोगल सेनापती मानसिंग ला अकबराने दरबारात यायला बंदी घातली होती , मोगलांनी युद्धानंतर गोगुंदा ठाणे घेतले तेथे लगेच संरक्षण भिंत बांधून घेतली एवढा दरारा या युद्धामुळे प्रतापसिंहांनी निर्माण केला होता .युध्दानंतर मोगलांना आंबे खाऊन दिवस काढावे लागले हा प्रतापसिह यांच्या रणनीती चा परिणाम होता. या युध्दानंतर प्रतापसिंह यांचा निर्धार वाढला आणी त्यांनी छापामार युदनीती चा अवलंब केला. बारा वर्ष घोर संघर्ष करून अकबराच्या हाताला काही लागले नाही. प्रतापसिहानी सर्व मेवाड परत मिळवले.नवी राजधानी चावंड ची निर्मिती केली. अनेक वीरांना व हुतात्मा झालेल्यांच्या वारसांना पुरस्कार देण्यात आले. प्रतापसिंह याना निष्ठावान भिल्ल समुदायाने उत्तम साथ दिली.हळदी घाटी च्या युद्धात मेवाडचा सेनापती हकीम खान सूर होता हे सुद्धा येथे नमूद करावेच लागेल. या संघर्षाचा काळात राजपूत सैन्याला मोगल सरदार अब्दुल रहीम खानेखाना वर हल्ला करताना त्याचे कुटुंब हाती लागले , प्रतापसिंहानी त्या कुटुंबाला सन्मानाने मुक्त केले , प्रतापसिह हे प्रजाहितदक्ष , चरित्रवान असे थोर राजे होते.त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या होत्या.पीपली ,ढोलांन, टिकड या सारख्या मोगलांनी उजाड केलेली ठिकाणे महाराणा नी पुन्हा वसवली,शेतकऱ्यांना नवीन जमिनी देण्यात आल्या ,शिक्षण व आरोग्याकडे हि लक्ष देण्यात आले.स्त्रिया, वृद्ध, मुले निर्भयपणे जगू लागली.अशा या महान नरेशा चा मृत्यू 19 जानेवारी 1597 साली झाला ,हि बातमी अकबराला समजल्या बरोबर तो स्तब्ध झाला . यावेळी अकबराचा दरबारी चारण दुरासा आढा याने प्रतापसिंह यांच्या बद्दल श्रद्धायुक्त कवितेचे वाचन केले . अकबराने चारण ला माझ्या भावना योग्य प्रकारे व्यक्त केल्यास असे म्हणून बक्षीस सुद्धा दिले
मुख्यसंपादक