काही महिन्यांपूर्वी ची एक घटना एका व्यक्तीला पाहता क्षणी तिच्याशी बोलता क्षणी तिच्या प्रेमात पडण्याचा मोह झाला, ती व्यक्ती माझ्या आठवणीत तर राहिली पणं मला वाटलं ती विसरून गेली असेल, मी नेहमी प्रमाणे स्टेशन वरून ऑफिस ला जात होते तेंव्हा मी तिला प्रथम पाहिलं होत, माझ्या डाव्या हाताला पकडुन म्हणाली “ये बायग तिथवर जरा सोडशिल “,
तिचा आवाज नाजूक, अंगावर हिरवी रानातली बहरलेली हिरवळ जशी तशी तीच लुगडं नऊ वारी..थोड थोड फाटलेले, बोलण्यात माधुर्य,
कपाळावर कुंकवाचा लाल जर्द टिळा, आणि हातात विरळ हिरव्या बांगड्या,
मी तिला हाताला पकडुन काही अंतरावर सोडलं , खरतर तिच्या बोलण्यातून कळलं की तिथेच कुठे तरी घरगुती काम करायची आणि तिची त्या दिवशी तब्बेत खूपच खराब होती, ……
म्हणून तिने माझा हात पकडला होता, पाणी पिऊन, थोडा फार संवाद साधून ती आपल्या कामावर गेली आणि मी सुध्धा पणं तिची जी छब्बी होती ती अगदी आई रुक्मिणी सारखी,माझ्या मनात खोलवर घर करून गेली,तब्बल आज खूपच महिन्या नंतर तशीच साडी तसाच पेहराव असलेली पणं त्या दिवशी पेक्षा जास्त तेज असणार्या त्या माईन मला ओळखलं..आवाज दिला….ये बाय
मला तिच्या आवाजाने खूपच आपुलकी वाटली, रोज मी त्या ठिकाणी पहायची पणं मला दिसली नाही, वयमानानुसार मला वाटलं विसरून गेली असेल,
..पणं ती नाही विसरली, पणं ती जेंव्हा तीच खऱ्या आयुष्यातलं २ वाक्य बोलली तेंव्हा खूपच वाईट वाटलं ऐकून,” …मी म्हटल आई तुम्ही या वयात आराम घेत जा ” तुमचा हा आराम करण्याचा वेळ आहे, कश्याला इतकी धावपळ,…
ती बोलली “बाय मला एक पोरगा अन सून अस मोठ्या पदावर नोकरी करत असत, …आम्हा दोघा आय बापास कधी विचारपूस नाय केली, आम्ही आपली राबून खातो.. मिळल ती भाकर आपली. बाय…
डोक्यावर वर हात ठेवत चल बाय मी जातंय काळजी घे बाय, म्हणत ती निघून ही गेली…..ती जाई पर्यंत एकच विचार चालू होता मेदुंच्या नसामध्ये जसा वणवा पेटावा तसा, कशी अशी दळभद्री लोक आहेत अजूनही आपल्या समाजात खुप प्रमाणात ज्यांना जन्म दिलेल्या आई बापाला २ घास भर वता येत नाही…..
केवळ रेल्वे स्टेशन वरच नाही आज बस स्टॉप, मंदिर, फूटपाथ, रोड वर, सिग्नल वर, कुठे दुकानासमोर देवाचे फोटोज घेऊन ,ब्रीज खाली, हॉटेल्स च्या बाहेर कोण मेट्रो, मोनो च्या स्टेशन खाली, प्लॅटफॉर्म वर, प्लॅटफॉर्म च्या पायरीवर , काउंटर च्या आसपास,.. अरे यार कुठे तर कचरा पेटी जवळ सुद्धा, अश्या आया..आणि वडील पणं दिसतात, वृद्धाश्रमात तर आहेतच भरलेले…
काय चुकी असते त्यांची..का आज आपल्याच आई वडिलांना समजून घेण्याची परिस्थिती नाहीय, काय वेळ बदलला आहे खरच,…इतका वाईट वेळ, जिने ९ महिने पोटात ठेवावं ज्याने अंगा खांद्यावर खेळवाव त्याला आयुष्याचे शेवटचे दिवस असे पाहावे लागते का….म्हणून…,?
का २१ साव्या शतकात विचारसरणी इतकी बदलली गेली आहे का की पैसा, शेत जमीन, आरामाची नोकरी , सुखसोयी मिळाली की माणूस आपल्याच माणसाला कस काय विसरू शकत….
सध्या च काही व्हिडिओ बातम्या ना दाखवण्यात आले आपल्याच आई वडिलांना काठीने मारणे, बादली ने मारणे, शिवी गाळ करणे, चक्क एक कीर्तनकार सुध्धा यात अस वागला आहे ,…अरे काही तरी लाज बाळगा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहोत याची कदर ठेवा, त्याहून मूर्ख असतात फक्त व्हिडिओ काढून अपलोड करणारे बघ्याची भूमिका घेणारे खूप कमी लोक असतात जे खरच काहीतरी धाडस करतात…आणि त्यासाठी काही करतात…
आजची ही सत्य परिस्थिती आहे आणि या पेक्षा वाईट म्हणन्यापेक्षा बेकरात बेकार परिस्थिती
या पेक्षा बेकार काही असू च शकत नाही ….
सीमेवर लढणारा जवान आपल्या भारत मातेसाठी आपल सर्व गमवायची तयारी ठेवतात अगदी जीव पणाला लाऊन असतात आणि इथे सीमेच्या आत आपल्या च आई बापाला घरात ठेवलं जातं नाही,
खूप भाग्यवान आहेत ते लोक ज्याच्या घरी आई रुक्मिणी आणि विठ्ठला सारखा बाप आहे म्हणून त्याच्या आयुष्यात युगे अठ्ठावीस उभा पांडुरंग आहे
जे लोक आपल्या आई बापाला समजून घेऊ शकत नाहीत ते या जगात कुणालाच समजू शकतच नाहीत…..
मी ही दिवा ते सीएसटी ४ वर्ष प्रवास केला आहे , कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा, कळवा,कोपर, आंबिवली, दिवा,बदलापूर, मुंब्रा माहीत नाही कुठून कुठून अश्या कित्येक वय झालेल्या आया आजही सीएसटी, चर्चगेट , मरिन लाईन्स, चर्नी रोड, ला घर कामासाठी , लहान मुलांच्या देखभालीसाठी येतात, त्यांच्या आयुष्यातला हा वेळ त्यांचा आराम करायचा वेळ असतो तरीही…
आपल्या देशातल्या गरिबीमुळे आणि त्या माय च्या शिकुनही अशिक्षित असलेल्या अश्या कितीतरी मुलामुळे त्यांना या वयातही राबाव लागत आपल घरचं सर्व आवरून दुसऱ्याचं घर साफ करावं लागत, आपल्या नातवंडां सोबत खेळायचे सोडून दुसऱ्यांची बाळ सांभाळावी लागतात, अश्या असंख्य आयाना , बहिनी ना,आणि समाजात प्रतेक स्तरावर आपापली जबाबदारी चोख पणे सांभाळत असणाऱ्या माझ्या बहिणी ना माझा मनापासून मानाचा
- रुपाली शिंदे ( आजरा )
मुख्यसंपादक