माझ्या बापानं विष घेतलं मित्रा
उद्या तुझाही बाप फासी घेईल
एक एक करून आपल्या
कष्टकरी कुळाचा नाश होईल
आज माझ्या दारातून उठली तिरडी
उद्या तुझाही दारातून उठेल
आम्ही पडलो उघड्यावर
तुही रस्त्यावर येशील
काळ जरा अवघड आहे
करू नकोस भूल
ज्यांच्या साठी पेटलो आपण
त्यांनीच विझवली चुल
तु चुकतोय मित्रा
जसा मीही चुकलो होतो
बापाच्या मारेकर्यांचे झेंडे
खांद्यावर घेऊन नाचलो होतो
संतोष पाटील
7666447112
मुख्यसंपादक