Homeमुक्त- व्यासपीठमास्क लावा..

मास्क लावा..

कोरोना विषाणू / महाभयंकर/
कापे थरथर/ नर नारी//1//

वेगी पसरतो/ नाकी तोंडी जातो /
फुफ्फुस घेरतो / घातकच //2//

कित्येक घायाळ / प्राणही घेतले /
संकट हे आले / कोरोनाचे //3//

मुखी लावा मास्क / सॅनिटायझर /
नियमित कर / धू मानवा //4//

गर्दी तुम्ही टाळा / नियम हे पाळा /
ऐक माझे बाळा / कृष्णा सांगे //5//

  • कवी – किसन आटोळे
    आष्टा ( बीड )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular