Homeआरोग्यमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्री म्हणतात , लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्री म्हणतात , लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार सुरु


चंद्रपूर- : कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील तसा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते. यावेळी वडेट्टीवारांनी अमरावती-नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवरुनही चिंता व्यक्त केली.
मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याबाबत दबाव होता हे मान्य करत, आता तिथली रुग्ण संख्या वाढली याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. आपत्ती व्यवस्थापनाचे नियम आणि कोरोना नियमावली पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे. लग्न आणि इतर जाहीर कार्यक्रमात होणारी गर्दी नियंत्रित करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम न पाळल्यास अंशतः लॉक डाऊनचा विचार करावाच लागेल याचा पुनरूच्चार वडेट्टीवार यांनी केला.
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीच्या दिवशी ३८०० कोरोना केसेस समोर आल्या. त्यानंतर डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोना केसेस वाढल्याचं समोर येतंय. त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचं आकड्यांवरुन लक्षात येतंय. लोकं कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. लोकं मास्क वापरत नाहीत. जरं हे सगळं असंच सुरु राहिलं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कठोर निर्णय घ्यावे लागतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular