काय तो सुकुमार देह होता जो प्रसंगी कठोर झाला,
काय ती मधुर वाणी होती जी खड्गासम तीक्ष्ण ही झाली,
काय ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते जे अनेकदा शत्रूचे कर्दनकाळ ठरले,
काय गुणगौरव करावा मी त्या मृत्यूलाही लाजवेल अशा धैर्य धुरंदर अमर आत्म्याचे,
आजपण तो नदीकिनारा थरथरतो,
वारंवार आपल्या उदकाने हुंदके देतो,
हर प्रहरी रक्तपर्शित पत्थरांना अश्रूंनी अर्घ्य देतो,
अजूनही तो भयभीत परिसर करूनेच्या किंचाळ्या फोडतो,
अजूनही तो तमस अघोरी मृत्युदंडाची ग्वाही देतो,
त्रिवेणीचा तो अभागी किनारा अजूनही साक्ष देतो,
धमण्यांमधील सळसळनाऱ्या पितृभक्त रक्ताची,
भूमिपुत्राच्या चिरफाड केलेल्या त्या पवित्र कातडीची,
अस्थाव्यास्थ विखुरलेल्या त्या भर यव्वाणातील राजदेहाची,
ज्याला छिन्नविच्छिन्न करून त्या क्रूर विकृत राक्षसांनी स्वतः ला नर्कात लोटले,
ती धरती माय का दुभंगली नाही?
त्रिवेणी ने जलप्रलय का आणला नाही?
का चंद्राने शीतलता संपवून ती रात्र तिथेच का संपवली नाही?
त्या नराधमांना अग्नी बाणांनी चंडांशूने का जाळले नाही?
का तेव्हा त्या मरुताने विषारी बनून मृत्यूत्तांडव केले नाही?
माझ्या राजाचे चे करुणामय नयन फोडताना पाहणारी सृष्टी आंधळी का झाली नाही ?
तुमचा हा मरणयातनांचा छळवाद नुसता ऐकून गतप्राण झालो आम्ही ,
हा त्याग लाखो जन्म घेतले कुणी तरीही विसरणार नाही,
तुम्ही आहात राजे शक्तीपीठ तुळापुरातील हर एक अतिसूक्ष्म अनुरेनुत,
तुम्ही दिसतात भगवंत म्हणून अमुचे त्या फडकणाऱ्या भगव्यात,
तुम्ही अमुच्या रक्तात भिनता,
मना मनात पाझरता,आणि
नयनअश्रूनतून कृतज्ञा म्हणून वाहता,
त्या प्रत्येक अश्रूंनी लक्षात ठेवली आहे तुमचीबली दानाची गाथा,असा पुन्हा होणे नाही कणखर निर्भिड मृत्यू वर विजय मिळविणारा मृत्युंजय राजा!
जय भवानी! जय शिवराय ! जय शंभुराजे!
- निशिगंधा
समन्वयक – पालघर जिल्हा