Homeमुक्त- व्यासपीठविस्मरणातला बाप…

विस्मरणातला बाप…

बापाची कविता काय लिहिणार
जन्म दिला आईने म्हणून तिचेच नाव होणार

बाप – बाप झाल्यावर होतो एक पालनहार
आई मात्र होते सदैव मायेचा आधार

पांघरण्यासाठी नेहमी असते बाप नावाची चादर
एका मायेच्या हाकेने आईचीच केली जाते कदर

स्वतःच्या वाढदिवशी करतो बाप सतत काटकसर
तरीही त्याच्या त्यागाकडे नसते कुणाचीही नजर

घराकडे लक्ष देताना स्वतःसाठी नसतो त्याला वेळ
बिघडले थोडे काही – घरातलेच त्याला विचारतात काय चालालाय तुझा खेळ

नावाला मात्र उरतो तो पुरुष म्हणून माणूस
कुणाला चुकून ओरडल्यास सगळेच बोलतात त्याला खडूस

बाप असताना वाकडं बघण्याची कुणाची काय हिम्मत
बाप नसताना मात्र कळते बापाची किंमत

कधीतरी फणफणतो अंगावर काढलेला असह्य ताप
त्याच तापात जग सोडून गेल्यावर आपल्याला कायमचा
स्मरणात राहतो तो बाप….

स्मरणात राहतो तो बाप….

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular