Homeकृषीशासकीय मत्स्यबीज केंद्रे लवकरात लवकर कार्यान्वित करावी - आमदार राजेश पाटील

शासकीय मत्स्यबीज केंद्रे लवकरात लवकर कार्यान्वित करावी – आमदार राजेश पाटील

मुबंई (प्रतिनिधी )- तिलारी मत्स्यबीज केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यसाठी मुंबई येथे मंत्री महोदयांच्या सोबत बैठक
काल मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहात मत्स्यपालन मंत्री नामदार अस्लम शेख यांच्या सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील तिलारी येथील शासकीय मत्स्यबीज केंद्र सुरू करण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ६५ पाठबांधरे व जलसंधारण खात्याच्या जलाशयाच्या माध्यमातून जवळपास ५००० ते ६००० हेक्टर जमीनत पाणी साठवले जाते. याच बरोबर जिल्हा परिषदेचे सुद्धा १५० तलाव आहेत ,जर तिलारी मत्स्यबीज केंद्र चालू झाले तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हातील जलाशयाच्या मत्स्य ठेकेदारांना व मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मत्स्यबीज सहज उपलब्ध होईल. तसेच मत्स्यव्यवसाय मध्ये नवीन येणाऱ्या तरुणांना जिल्ह्यातच मत्स्यबीज उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल, व तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतील. सध्य स्थितीत बेळगाव, हुबळी, कोल्हापूर, सांगली हे मत्स्य बाजार उपलब्ध आहेत, यामुळे यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून तिलारी मत्स्यबीज केंद्र तात्काळ चालू करावे अशी मागणी मा आमदार राजेश पाटील यांनी केली, यावेळी मा.मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व तातडीने केंद्र चालू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपस्थित उपसचिव मत्स्य श्रीनिवास शास्त्री सो,जॉईंट कमिशनर आर. आर जाधव सो, कोल्हापूर सहाय्यक आयुक्त प्रवीण सुर्वे सो, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई राजेंद्र जाधव सो, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय पुणे विभाग अभय देशपांडे सो, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी तिलारी मत्सबीज केंद्र सतीश खाडे सो , उपायुक्त मत्स्यव्यवसाय युवराज चौगुले सो बैठकीला उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular