शिवराय नसते तर
महाराष्ट्रात राहीले नसते मराठे
शिवराय नसते तर….
बहूत जनांना रक्तबंबाळ
करण्यासाठी दुस्मनानी पावलो
पावली पेरले असते काटे
शिवराय नसते तर..
कूठेच फडफडताना दिसला
नसता भगवा ध्वज
मूर्ती अन् मंदीरांच पावीत्र्यचं
नाही तर जनमंदीरांचा ढाचाच
उध्वस्त झाला
असता महाराष्ट्रात
शिवराय नसते तर…
होती तलवारीला धार
किती झेलले मावळ्यांनी वार
काटे तूडवीत पावलांनी
गड किल्ले केले पार
त्या आठवणी ही नसत्या
झाला नसता मातृभूमीचा
जय जयकार
शिवराय नसते तर…
बूरख्याआड दाबल्या गेल
असत स्त्रियांच अयूष्य
लाखो हजारों वर्षांच्या महान
संस्कृतीचं दिसलं नसत् कोणालाच द्रष्य
तूडविले असते यवनांनी पायंदळी
मरण झाले असते स्वस्त
शिवराय नसते तर…
शिवराय नावाचा एकच
माणूस पण त्यान कोटयावधी
कूळांचा उद्धार केला
प्रानाहूणही प्रिय असा भगवा
ध्वज मानाने फडकाविला
त्यांनी जमविली जिवाला
जिव देणारी मानस्
त्यांनी निर्मविले बहुत
जनांसाठी स्वराज्य
शिवराय नसते तर
नाही करवत ही कल्पना
हर हर महादेव,
जय जिजाऊ जय शिवराय
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
होते गर्जना.
- जगन्नाथ काकडे
मेसखेडकर9604844321
टीप-: रचनेतील मराठा हा शब्द जातीवाचक नसून प्रांतवाचक आहे
मुख्यसंपादक