( जगन्नाथ काकडे पाटील ) – शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मेसखेडा आयोजित शिवजन्मोत्सव मेसखेडा यथे शिवशाहीर अरविंदजी घोगरे यांचा शाहीरी बाणा संच शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
शिवशाहीर अरविंदजी घोगरे यांनी त्यांच्या वयक्तीक संपादित केलेल्या अनोख्या शैलीतून रंगतदार आणी अंगावर शहारे उभे करणारा कार्यक्रम सादर केला.
अरविंद घोगरे यांची पार्श्वभूमी बघता घरातून कसलीही शाहिरी परंपरा नसताना शेतकरी मराठा कुटुंबातून एका छोट्याश्या म. चिंचोली सारख्या गावातून हा कलाकार महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरही आपल्या कलेच दर्जेदार सादरीकरण करत आहे. शेतीमातीसी घट्ट नाते आसनारे घागरे शेतात स्वतः राबतात संपूर्ण महाराष्ट्रात नाव असणारे अक्षरश पेरणी पासून ,पाणी देणे वा सोगंणीचे कामे स्वतः करतात . मागील काही वर्षांपासून शेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सकस धान्य ते पिकवतात यातून असे लक्षात येते की तूम्ही यशाच्या शिखरावर असताना तुमचे पाय कायम जमीनीवर असले पाहिजेत. त्यांच्या पोवाड्यातूण लढाया पलीकडचे शिवराय त्यांचा स्त्री विषयक द्रष्टीकोण सामाजिक, शेतीविषयक द्रष्टीकोण छत्रपती हे कसे रयतेचे राजे होते हे या माध्यमातून मांडतात. अन त्यांना या माध्यमातून तितकाच उदंड प्रतिसादही मिळतो आहे.
छत्रपती आणी राष्ट्रसंत तुकोबाराय यांच्या विचारांचा प्रसार त्यांच्या हातून असाच होत राहो. त्यांच्या पहाडी आवाज महाराष्ट्रच नाही तर देशात आणि विदेशातही शिववीचारांचा जागर शिवशंभूचा पराक्रम पोवाड्यातूण मनामनाध्ये बुलंद होवो ही जिजाऊ चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा
मुख्यसंपादक