आम्ही शांत आहोत
संयमी आहेत
समजूतदार आहोत
आणि संख्येने ही जास्त आहोत
या व्यवस्थेने कायमचं ग्रहीत
धरलेल्या आम्हाला
आमच्यावर आजवर होत असलेल्या
अन्याय आत्याचार
यावर प्रतीक्रीया देण्यासाठी गांधींच्या
मार्ग अनुसरला म्हणून
आम्हांला प्रवाहाच्या बाहेर ठेवणार्यांसाठी सांगतो
आमचा राग कोणत्या जाती-धर्मावर नाही
कोणत्या पंथावर नाही…
आम्ही या बाजारू व्यवस्थेचे बळी आहोत
या निर्दयी, निष्ठूर व्यवस्थेच्या कानशिलात
लावण्यासाठी
भगतसिंग आमच्यात कधी संचातील
हे सांगताच येत नाही
आज संयमाचा बुरुज ढासळतो आहे
म्हणूनच हे ही कायम लक्षात
असू द्या की शिव शंभू चा वारसा
आमच्या रक्तातच आहे..
- जगन्नाथ काकडे
मेसखेडा
मुख्यसंपादक