काही लोकांचा जन्म एका विशिष्ट कारणासाठी होतो आणि मग ते किती आयु जगले यापेक्षा त्यांच्या जीवनकालावधीत आपल्या परिसस्पर्शाने मातीचे देखील कसे सोने केले याची ग्वाही इतिहास देतो. स्वामी विवेकानंद हे नाव उच्चारताच एक वेगळीच दैवी ऊर्जा आपल्यात संचारते. एक लहान तरुण आपल्या केवळ विचारसरणीने अख्खं जग कसं बदलू शकतो आणि अनेकांचे आयुष्य कसे घडवू शकतो याचे उदाहरण अनुभवायला मिळते.श्रीमंती पाहिलेल्या स्वामी विवेकानंद यांना बाल्यावस्थेत वडिलांचा अकस्मात निधनाने हलाखीचे दिवस पाहावे लागले. खूप कठीण प्रसंगातून जात असताना देखील त्यांनी आपले गुरू रामकृष्णा यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा वसा, स्वतःच्या तल्लख बुद्धिमत्तेने जगासमोर मांडून भारताचे नाव उंचावले.शेकडो वर्षांपूर्वीचे त्यांचे विचार आजही आपल्याला प्रभावित करतात आणि आजही देश व विदेशात अभ्यासले जातात. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक आजही त्यांच्या महान कार्याची साक्ष देते.अध्यात्मिक,धार्मिक, साहित्यिक,तत्त्वज्ञानआणि इतिहास या विविधांगी गोष्टींचे खोलवर ज्ञान असलेला हा अवलिया दुसरा होणे नाही. आयुष्यात प्रत्येकाने ध्येय ठेवून ते साध्य करण्यास प्रयत्न केले पाहिजे अशी त्यांची शिकवण होती. आज बारा जानेवारी रोजी अशा पवित्र संताची जयंती असून त्यांच्या महान आत्म्यास शतकोटी प्रणाम.
मुख्यसंपादक
[…] स्वामी विवेकानंद जयंती विशेष अमित गुरव […]