Homeघडामोडी50 वे विज्ञानप्रदर्शन संपन्न

50 वे विज्ञानप्रदर्शन संपन्न

शैलेश मगदूम (निंगुडगे): पंचायत समिती शिक्षण विभाग, राजाभाऊ केसरकर हायस्कूल आणि श्री. बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज, निगुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वे विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक, सरोळी गावचे सुपुत्र सुहास पाटील (उपसंचालक क्रीडा व युवा सेवा महाराष्ट्र राज्य) को. जी.मा.शिक्षण अध्यक्ष लाड सर.गटशिक्षण अधिकारी बसवराज गुरव (पंचायत समिती आजरा )निंगुडगे,सरोळी व कोवाडे गावचे सरपंच व सर्व सदस्य माजी. उप सभापती वर्षां बागडी. आजरा ता. सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक,विज्ञान शिक्षक विध्यार्थी विज्ञान प्रदर्शनासाठी उपस्थित होते.
प्राथमिक विद्यार्थी मध्ये प्रथम क्रमांक – राजवर्धन संदीप पाटील (रोजरी इंग्लिश स्कूल आजरा) द्वितीय – वेदांत वसंत नरके (पंडित दीनदयाळ आजरा) तृतीय – महेश दिलीप पाटील(विद्यामंदिर मेंढोली)
माध्यमिक विद्यार्थी मध्ये प्रथम- आदित्य मारुती पाटील(पार्वती शंकर विद्यालय उत्तूर) द्वितीय-श्रेयस दत्तात्रेय खोराटे (भादवण हायस्कुल ) तृतीय – कोमल संतोष लाड व गौरी धनंजय सावंत( व्यकंटराय हायस्कुल आजरा) यांनी बाजी मारली समोर
प्राथमिक शिक्षक मध्ये विठोबा शेवाळे(विज्ञानिकेतन कोवाडे) नंदकुमार पाटील(केंद्रशाळा उत्तूर) व सुनील कामत( विद्यामंदिर वाटंगी ) व माध्यमिक शिक्षक मध्ये श्रीमती आशा गुरव( व्यकंटराय हायस्कुल आजरा)रोहिता सावंत(मडीलगे हायस्कुल)सुनील चव्हाण(केदारी रेडेकर हायस्कुल पेद्रेवाडी) यांनी बाजी मारली.


प्रयोगशाळा परिचर म्हणून इम्रानखान असद खान जमादार उत्तूर यांचे योगदान लाभले.या विज्ञान प्रयोगशाळा मध्ये माध्यमिक माध्यमिक प्रयोग उपकरणे व शिक्षक 39 ,प्राथमिक प्रयोग उपकरणे व शिक्षक 45 तसेच प्रयोगशाळा परिचर 1असे एकूण उपकरणे व शाळा समाविष्ट होते.


विज्ञान प्रदर्शनास आलेल्या सर्वांचे तसेच मेहनत केलेल्या सर्व हातांचे आभार हायस्कुल च्या मुख्याध्यापिका कल्पना चौगुले यांनी मानले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular