कोल्हापूर (अमित गुरव ) -: जिल्ह्यासह राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ ) च्या निवडणुकीची २ मे ही तारीख ठरली त्याची अधिकृत घोषणा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने केली. २५ मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होत असून आता राजकीय हालचाली आणि भेटीगाठीला जोमाने सुरवात होईल.
निवडणूक होणार न होणार याची आता चर्चा संपुष्टात आली असून इच्छुक उमेदवार रणांगणात शड्डू मारून आहेतच. अर्ज भरण्यापासून ते माघारी प्रक्रिया नावडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये होईल. मतदान आणि मतमोजणी कोठे होणार हे अजूनही निश्चित नसले तरी उमेदवारी अर्ज भरणे प्रक्रिया संपल्यावर ह्या जागांचा शोध घेण्यात येणार असे सांगितले आहे.
निवडणूक कार्यक्रम-:
२५ मार्च ते 1 एप्रिल – उमेदवारी अर्ज भरणे
५एप्रिल – उमेदवारी अर्ज छाननी
६ एप्रिल – वैध उमेदवार यादी प्रसिध्द
६-ते २०एप्रिल- उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी
२२ एप्रिल – उमेदवारांना चिन्ह वाटप
२ मे – मतदान
४ मे – मतमोजणी
मुख्यसंपादक