सध्या कोरोनाने पूर्ण जगभर हाहाकार मांडला आहे. मागच्या वर्षी आलेल्या या कोरोनाने सर्वत्र वाट लावली आहे. पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली आता तिसऱ्या लाटेकडे वेगवान पद्धतीने फैलाव होत आहे.
जेव्हा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला याची लागण होते त्यावेळी किती धावपळ करावी लागते हे मी स्वतः अनुभवले आहे. माझ्या ओळखीचा अगदी जवळचा मित्र वय ५३ वर्षे याला या रोगाची लागण झाली. त्याच्या घरी बायको, ३ मुली आणि २ मुले असा मोठा परिवार आहे. यांना सांभाळायची जबाबदारी या माझ्या मित्राची आहे. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक आहे. एकदा त्याला सहज म्हटलो की, भाई तू कितव्या वयापर्यंत काम करणार आहेस? त्यावेळी त्याने सांगितले की, जोपर्यंत माझ्या ३ मुलींचे लग्न होत नाही तोपर्यंत. एकदा का झालो त्या जबाबदारीतून मुक्त तर मी मोकळा होईन.
हा रोग पूर्ण क्षमतेने संक्रमित होत असताना, हा आमचा भाई सुद्धा २ एप्रिल रोजी पॉजिटिव निघाला. त्याला लगेच एका मोठ्या नामांकित दवाखान्यात दाखल केले. त्याची तब्येत पूर्ण बिघडली आणि त्याला व्हेंटिलेटर वर ठेवले.
तीन दिवसानंतर मला समजले की, हा आमचा मित्र दवाखान्यात दाखल झाला आहे आणि त्याला खूप त्रास होत आहे. मी आणि माझा मित्र श्री. शितलनाथ त्यांच्या घरी गेलो. त्याची बायको सर्व सांगून खूप रडत होत्या. त्यांना धीर देत आम्ही सांगितलो की, काही होणार नाही भाईला तो खूप तंदरुस्त आहे. त्यांच्या मुलीने डॉक्टरांची चिट्टी हातात दिली आणि म्हणाली की, ” हे इंजेक्शन सध्या मिळत नाही.” ते इंजेक्शन रेमडीसिवीर होते. माझ्या एका जवळच्या केमिस्टकडे चौकशी केली, तर त्यांनी सांगितले की, एका मित्राकडे आहे पण त्याची किंमत ५८०० रुपये आहे. माझा मित्र म्हणाला की, एका ठिकाणी मोठे मेडिकल आहे तेथे जाऊ. आम्ही लगेच गाडीवरून ते इंजेक्शन मिळवण्यासाठी गेलो. पहिल्या मेडिकल मध्ये ते मिळाले नाही. दुसऱ्या एका ठिकाणी माहिती मिळाली की, पिंपरी मध्ये एका मेडिकल मध्ये सध्या मिळेल. तेथे आम्ही ताबडतोब पोहोचलो आणि ते इंजेक्शन २००० रुपयांत मिळाले. ते इंजेक्शन लगेच घेऊन दवाखान्यात त्या भाईच्या मुलीकडे दिले.
क्रमशः
लेखन – श्री.सनी चंद्रकांत कुंभार.
मुख्यसंपादक
एखाद वेळेस देव भेटेल पण रॅमडेस्विर मिळणार नाही अशी परिस्थिती आहे
हो मॅडम..अगदी बरोबर..