कोल्हापूर – : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर जावून पाणी धोका पातळीकडे सरकत आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.पूर परिस्थितीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सन 2021 साली कोल्हापूर शहरामध्ये महापुराचे पाणी आलेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. त्यावेळी पूर पातळी वाढत जाईल त्यानुसार शहरात काही ठिकाणी महापुराचे पाणी आले होते. पूर पातळी व शहरातील पुराचे पाणी येण्याची संभाव्य ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत -43 फूट- सुतारवाडा 45 फूट- जुने शिये नाका ओढ्यावर पाणी येवून बावडा रस्ता बंद 45 फूट- रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा बटाटा मार्केट शाहूपुरी कोंडा ओळ46 फूट 5 इंच- व्हिनस कॉर्नर, व्हिनस टॉकीज ते बर्फ फॅक्टरी रस्ता बंद, नाईक मळा, पोलो ग्राऊंड 47 फूट 2 इंच- पंचगंगा हॉस्पिटल, जामदार क्लब, शुक्रवार पेठ पश्चिम बाजू 47 फूट 2 इंच- आयडियल कॉलनी लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा व शिंगणापूर रस्ता बंद 47 फूट 4 इंच- शाहूपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा, यशोधा पार्क, मलयगिरी अपार्टमेंट, जाधववाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत येथे पाणी येते. 47 फूट 5 इंच- रेणुका मंदिर गुंजन हॉटेल, त्रिंबाली नगर, रेणुका नगर, घाडगे गृहयोग व रेणुका मंदिर पिछाडीस पाणी येते. माळी मळा, मेडिकल कॉलेज बावडा, उलपे मळा, रमण मळा, जावडेकर इमारत, नाईक मळा, पॅलेस पिछाडीस, राजहंस प्रिंटिंग प्रेस, हरिपूजा पुरम * त्रिकाणी बाग ते महावीर कॉलेज रस्ता बंद * केव्हिज पार्क, दीप्ती पार्क, डायमंड हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल* खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद * जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज वाया पाटलाचा वाडा रस्ता बंद * बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद * भालजी पेंढारकर हॉल परिसर (महावीर गार्डन दक्षिण बाजू)* दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद *दुर्गा मंदिर (लक्षतीर्थ वसाहत ) 47 फूट 5 इंच- विलसर पूल ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद* लक्ष्मीपुरी ते नाईक अँड नाईक कंपनी रस्ता बंद*गवत मंडई रस्त्याची पश्चिम बाजू पाण्यात47 फूट 7 इंच- सुभाष रोड (टायटन शोरुम ते फोर्ड कॉर्नर) रस्ता बंद47 फूट 8 इंच- पिनाक, सनसिटी, माळी मळा, महावीर कॉलेज पिछाडिस, पोलो ग्राऊंड, जावडेकर अपार्टमेंट, ड्रिम वर्डची मागील बाजूस48 फूट – मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते मलयगिरी रस्ता बंद* काटे मळा ते सफायर पार्क रस्ता बंद* मेनन बंगला ते शेळकेसो नगरसेवक घरासमोरील रस्ता बंद48 फूट 8 इंच- शंकराचार्य मठ, पंचगंगा तालीम (जामदार क्लब ते पंचगंगा हॉस्पिटल रस्त्याची पश्चिम बाजू पूर्ण पाण्यात )* उषा टॉकिज (बी न्युज ऑफिस ते व्हीनस कॉर्नर रस्ता बंद (स्टेशन रोड)49 फूट 11 इंच- घोडकेवाडी, मुक्त सैनिक वसाहत पूर्व बाजू, एमएसईबी, बापट कॅम्प, कदमवाडी, गणेश पार्क51 फूट – दुधाळी (कोल्हापूर ऑर्थोपेडीक सेंटर, महाराणा प्रताप हायस्कूल) उत्तरेश्वर गवत मंडई नाका, दुधाळी ग्राऊंड परिसर51 फूट 8 इंच- कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्ता बंद53 फूट – बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग पाण्यात (जिल्हाधिकारी कार्यालय पिछाडीस उमेदपुरी)55 फूट 7 इंच- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंदाजे 3 ते 4 फुट पाणी होते व जिल्हाधिकारी कार्यालय समोरील भाग (नागाळा पार्क) पुराचे पाणी आले आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 7.02 टीएमसी पाणीसाठा आहे. सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून एकूण 78 बंधारे पाण्याखाली आहेत.
मुख्यसंपादक