आभाळ फाटलं आहे,
धरणीला ही कम्प सुटलाय,
रात्र वैऱ्याची असली तरी हवालदिल होऊ नकोस,
विश्वास ठेव, हेही दिवस सरतील….
धीर नको सोडूस , घाबरून नको जाऊस ,
ज्यानं जन्माला घातलंय त्यालाही काळजी हाय,
तू तुझे कर्म कर तो त्याचं करेल,
आणि हेही दिवस सरतील….
जरी दाही दिशा झाल्यात बंद,
तरी अंधारात काजवा मार्ग दाखवत असतो,
उगवणाऱ्या सूर्याची तोही ग्वाही देऊन जातो,
सांभाळ स्वतःला, हेही दिवस जातील…
विधात्याची अप्रतिम कलाकृती आहेस तू,
सृष्टीची वंदनीय रचना आहेस तू,
नक्कीच तोही हजारो बाहुनी तारेल तूला,
धीर धर थोडा, हेही दिवस सरतील….
- Sunita Khengle ✍️
मुख्यसंपादक
खूप सुरेख कविता…