आजरा – ( अमित गुरव ) -: कृष्णाव्हॅली अँडव्हान्स ॲग्री फाउंडेशन शाखा उत्तुर येथे उपसंचालक रामेती कोल्हापूर डॉ. सी. जी . गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तुम्ही घेतलेले ज्ञान इतर लोकांना द्या आणि त्यांना सुद्धा आपल्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा. आम्हाला या कृषी प्रधान देशात कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे असे म्हणाले .
प्रो. ऋतुराज चव्हाण यांनी आम्हाला गायकवाड सरांच्या सानिध्यात राहून खूप काही शिकायला मिळते. त्यांच्यासारखेच तुम्ही ही कृषी झोकून देऊन काम करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी सचिन पाटील ( नोडल ऑफिसर ) यांनी श्री. गायकवाड , श्री चव्हाण , आणि श्री. अभिनंदन परुळेकर (CA ) यांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन आणि आभार सुधाकर जोशीलकर ( समन्वयक) यांनी मांडले. यावेळी व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यसंपादक