प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्हातील उतूर ता आजरा येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक बरोबर आरोग्यालाही महत्व देऊन कार्यरत आसणारी गेली 15 वर्षे कोल्हापूर पश्चिम भागातील ग्रामीण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन, उतूर या संस्थेच्या कामाची माहिती घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श संस्था – संघटना कार्य गौरव समाजरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण होईल अशी माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सागर शेळके यांनी दिली. आदर्श संस्था – संघटना कार्य गौरव समाजरत्न पुरस्कारासाठी निवड झालेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहें. द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळयात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तीचा- संस्थाचा पुरस्कार देऊन दिगग्ज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे.
पोलीस मित्रसंघटना, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी आंदोलनमध्ये सहभाग घेऊन सर्व सामान्यांचे विविध प्रश्न सोडणवीन्याचे काम उत्कृष्ट रीतीने पार पाडले.त्याबरोबर गुणवंताचा गौरव, पुस्तक पिढी, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन व्याख्याने, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम, जनगणना अभियान, महा आरोग्य शिबीर, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ व वकृत स्पर्धेचे आयोजन, खेळाडूंना कौशल्य धिष्ठित मार्गदर्शन, गरजू व पूरग्रस्तांना यथाशक्ती आर्थिक मदत, नामवंत साहित्यिकांची भेट, समाजात घडणाऱ्या घडामोडीवर सातत्याने विविध प्रबोधन, प्रगतशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बचत गटांना व्यवसायिक मार्गदर्शन , गरजू गरीब विद्यार्थ्यांना अनाथ, मतिमंद,अपंग संस्थाना मदत यासारख्या लहानपासून जेष्ठ नागरिकांपर्यत तत्पर सेवा सुविधा पुरवून समाजासाठी झटणारे व विविध उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबिवणारे डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन होय. यासारखी प्रभावी कामे पार पडल्यामुळे पुरस्कारसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ एस. जी. पोवार यांनी दिली. डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चे आधारस्तंभ व मार्गदर्शक डॉ. जी. एम पोवार, उपाध्यक्षा संगीता भोसले, ट्रस्टी रणजित पोवार, डॉ भरत मोहिते, दयानंद पोवार, एम. आर. पाटील, ऍड. सुशांत पोवार, संदीप चोथे, सुधीर पोवार, सरिता पोटे, सुमिता देवेकर व इतर ही सदस्यांचे सर्व स्तरातून, मान्यवर, मित्रपरिवार व विविध संस्थाकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे..
मुख्यसंपादक